नवी दिल्ली - कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतीय यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत आणि अनुभवी फलंदाज सुरेश रैना यांनी सोमवारी सरावाला सुरुवात केली. सर्व खबरदारीची पावले उचलून दोघेही गाझियाबादमधील नेट सत्रादरम्यान फलंदाजी करताना दिसले. गाझियाबादमध्ये कोरोना व्हायरसची तीन हजारांहून अधिक प्रकरणे समोर आली आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
रैनाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तो पंतबरोबर सराव करताना दिसत आहे. त्यांनी लिहिले, "कठोर परिश्रम करा, कधीही हार मानू नका. तुम्हाला त्याचे बक्षीस मिळेल."
इंग्लंडमध्ये 2018 ला रैनाने आपला शेवटचा सामना खेळला होता. त्यानंतर तो भारतीय संघापासून दूर आहे. तर, पंतला महेंद्रसिंह धोनीचा उत्तराधिकारी म्हणून पाहिले जाते. मात्र, संधी मिळूनही त्याला अपेक्षित कामगिरी नोंदवता आलेली नाही.
रैना आणि पंतच्या आधी चेतेश्वर पुजारा, उमेश यादव, रोहित शर्मा, मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा या स्टार खेळाडूंनीही 'नेट प्रॅक्टिस' सुरू केली आहे. या वर्षाच्या अखेरीस भारत ऑस्ट्रेलिया दौर्यावर जाणार आहे. जेथे दोन्ही संघ चार सामन्यांची कसोटी मालिका खेळतील.