मुंबई - कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी सर्वस्तरातून मदतीचा ओघ येत आहे. अनेक आजी-माजी खेळाडू, उद्योगपती हे सरकारी यंत्रणांच्या मदतकार्यासाठी पुढे येत आहेत. अशातच आयपीएलमधील सनराईजर्स हैदराबाद संघाने मोठ्या मदतीची घोषणा केली आहे. त्यांनी कोरोनाविरुद्ध लढ्यात मदतकार्यासाठी १० कोटींचा निधी दिला आहे.
-
Sun TV Group (SunRisers Hyderabad) is donating Rs.10 Crores towards Corona Covid-19 relief measures. #COVID19 #CoronaUpdate
— SunRisers Hyderabad (@SunRisers) April 9, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Sun TV Group (SunRisers Hyderabad) is donating Rs.10 Crores towards Corona Covid-19 relief measures. #COVID19 #CoronaUpdate
— SunRisers Hyderabad (@SunRisers) April 9, 2020Sun TV Group (SunRisers Hyderabad) is donating Rs.10 Crores towards Corona Covid-19 relief measures. #COVID19 #CoronaUpdate
— SunRisers Hyderabad (@SunRisers) April 9, 2020
भारतामध्ये कोरोनाचा विळखा घट्ट होताना दिसत आहे. सध्या देशात कोरोनाचे ५८६५ रुग्ण आहेत. तर १६९ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. केंद्र आणि राज्य सरकार यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याकामी आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे. या आवाहनाला सर्वस्तरातून प्रतिसाद मिळत आहे. आयपीएलमधील सनराईजर्स हैदराबाद संघानेही १० कोटींची मदत देत सामाजिक बांधिलकी जपली आहे. सनराईजर्स हैदराबाद यांनी यांची माहिती ट्विटरवरुन दिली आहे. संघाचा सदस्य डेव्हिड वॉर्नरने त्यांच्या या कामाचे कौतुक केले आहे.
-
How good is this well done Sun TV Group @SunRisers https://t.co/bToZNyQNdx
— David Warner (@davidwarner31) April 9, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">How good is this well done Sun TV Group @SunRisers https://t.co/bToZNyQNdx
— David Warner (@davidwarner31) April 9, 2020How good is this well done Sun TV Group @SunRisers https://t.co/bToZNyQNdx
— David Warner (@davidwarner31) April 9, 2020
दरम्यान, याआधी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) पंतप्रधान मदत निधीसाठी २५ लाखांची मदत केली आहे. कोलकाता येथील फुटबॉल क्लब मोहन बागाननेही २० लाख रुपये दिले आहेत. याशिवाय सचिन तेंडुलकर, सुनिल गावसकर, सौरव गांगुली, अजिंक्य रहाणे, बजरंग पुनिया, पी. व्ही. सिंधू, मेरी कोम, मिताली राज, रोहित शर्मा, विराट कोहली, पूनम यादव, दीप्ती शर्मा, केदार जाधव, हरभजन सिंग, युवराज सिंह, हिमा दास, इरफान पठाण, युसूफ पठाण, चेतेश्वर पुजारा, अर्जुन भाटी आदींनी मदत दिली आहे.
हेही वाचा -सचिनने अंजली वहिनीसोबत 'डार्लिंग, आंखें चार करने दो' गाण्यावर केला डान्स, हरभजनने सांगितली आठवण
हेही वाचा - 'व्हेंटिलेटर देऊ, तुम्ही दहशतवादी सोपवणार का?' नेटीझन्सचा शोएबला सवाल