सिडनी - ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्टिव्ह स्मिथने भारताविरुद्धच्या सिडनी कसोटीतील दुसऱ्या डावात अर्धशतक ठोकत पाकिस्तानचा इंजमाम उल हक आणि वेस्ट इंडीजचा शिवनारायण चंद्रपाल यांच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. इंजमाम आणि चंद्रपाल यांनी आपल्या कसोटी कारकीर्दीत ११ वेळा एका कसोटी सामन्यातील दोन्ही डावात ५० हून अधिक धावा केल्या होत्या. स्मिथने या विक्रमाशी बरोबरी साधली आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा सामना सिडनीमध्ये खेळला जात आहे. स्मिथने या सामन्यात पहिल्या डावामध्ये १३१ धावांची खेळी केली. तर दुसऱया डावात देखील त्याने ८१ धावांची खेळी साकारली.
-
The foot is officially down!
— cricket.com.au (@cricketcomau) January 10, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Live #AUSvIND: https://t.co/KwwZDwbdzO pic.twitter.com/nLjGswZ4xR
">The foot is officially down!
— cricket.com.au (@cricketcomau) January 10, 2021
Live #AUSvIND: https://t.co/KwwZDwbdzO pic.twitter.com/nLjGswZ4xRThe foot is officially down!
— cricket.com.au (@cricketcomau) January 10, 2021
Live #AUSvIND: https://t.co/KwwZDwbdzO pic.twitter.com/nLjGswZ4xR
कसोटी क्रिकेटमध्ये एका कसोटीतील दोन्ही डावात सर्वाधिक वेळा ५० हून अधिक धावा करण्याचा मान ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंगच्या नावे आहे. त्याने आपल्या कारकीर्दीत १५ वेळा अशी कामगिरी केली आहे.
पाँटिंगनंतर दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिस आणि इंग्लंडचा अॅलिस्टर कूक यांचा नंबर लागतो. या दोघांनी प्रत्येकी १४-१४ वेळा अशी कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार अॅलन बोर्डर हे या यादीत तिसऱ्या स्थानी असून त्यांनी १३ वेळा असा पराक्रम केला आहे. १२ वेळा अशी कामगिरी नोंदवत श्रीलंकेचा कुमार संगकारा चौथ्या स्थानावर आहे.
हेही वाचा - IND VS AUS: भारतीय संघाला मोठा धक्का; दुखापतग्रस्त जडेजा ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर
हेही वाचा - Ind vs Aus : बुमराह आणि सिराजवर प्रेक्षकांनी केली वर्णद्वेषी टीका; राजीव शुक्ला म्हणाले...