नवी दिल्ली - जेव्हापासून अनुष्का शर्मा माझ्या आयुष्यात आली तेव्हापासून मी शांत आणि संयम राखणे शिकलो, असे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने म्हटले आहे. विराट आणि अनुष्का हे दोघे 2013 मध्ये एकमेकांना भेटले होते. 2017 मध्ये हे 'स्टार कपल' विवाहबंधनात अडकले.
विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी आयोजित केलेल्या ऑनलाइन सत्रात विराटने हा खुलासा केला. जीवनाविषयी बोलताना तो म्हणाला, ''खरे सांगायचे तर अनुष्का आणि मी जेव्हा भेटलो तेव्हापासून मी संयम बाळगायला शिकलो. मी पूर्वी खूप अधीर असायचो. आम्ही दोघे एकमेकांकडून शिकतो. तिला कठीण परिस्थितीत शांत राहिल्याचे पाहून मला खूप प्रेरणा मिळाली. जेव्हा परिस्थिती कठीण असेल, तेव्हा आपणास आपले महत्त्व कमी करावे लागते. एखाद्या कठीण परिस्थितीतही तुम्हाला राहावे लागते, तुम्हाला झगडावे लागते आणि शेवटी तुम्हाला मार्ग सापडतो. ”
31 वर्षीय कोहलीने सांगितले, की राज्य संघात निवड न झाल्यामुळे तो एकदा ओरडला आणि रडला होता. "पहिल्यांदाच मला राज्य संघात निवडले गेले नाही. मला आठवते की रात्रीची वेळ होती आणि मी फक्त रडत होतो. सकाळी तीन वाजेपर्यंत मी खूप रडत होतो. होते. मला निवडले जाण्याचे कारण समजू शकले नाही. मी धावा केल्या होत्या. तरीही मला निवडले गेले नाही. माझी निवड का झाली नाही हे मी दोन तास माझ्या प्रशिक्षकाला विचारत राहिलो. पण जेव्हा प्रेरणा आणि जिद्द ठेवली तेव्हा सर्व काही सुरळीत झाले", असे कोहली म्हणाला.