कराची - सुरक्षेचा प्रश्नावरुन झालेला वाद बाजूला ठेवत श्रीलंकेचे खेळा़डू पाकिस्तानात दाखल झाले आहे. एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळण्यासाठी आलेल्या लंकेच्या खेळाडूंना पाकिस्तानात 'झेड-प्लस' सुरक्षा मिळाली आहे.
हेही वाचा - धोनीने इन्स्टाग्रामवर शेअर केला गल्ली क्रिकेटचा मजेशीर व्हिडिओ
सुरक्षारक्षकांचे मंडळ पोहोचल्यानंतर काही तासांनी लंकेच्या संघाचे पाकिस्तानात आगमन झाले. कडेकोट बंदोबस्तामध्ये खेळाडूंना ओल्ड कराची विमानतळावरून बुलेट प्रूफ बसद्वारे हॉटेलवर पोहोचवण्यात आले. पाकिस्तानतचा क्रिकेट संघही कराचीत दाखल झाला आहे.
मार्च २००९ मध्ये लाहोर येथे लंकेच्या खेळाडूंवर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यामध्ये खेळा़डू जखमी झाले होते. पाकिस्तानच्या सहा पोलिसांचा आणि दोन नागरिकांचा या हल्यात मृत्यू झाला होता.
-
📸 Arrival of Sri Lanka team at Karachi for ODI & T20I series against Pakistan! #PAKvSL pic.twitter.com/FinGhRt3bX
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) September 24, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">📸 Arrival of Sri Lanka team at Karachi for ODI & T20I series against Pakistan! #PAKvSL pic.twitter.com/FinGhRt3bX
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) September 24, 2019📸 Arrival of Sri Lanka team at Karachi for ODI & T20I series against Pakistan! #PAKvSL pic.twitter.com/FinGhRt3bX
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) September 24, 2019
या हल्यानंतर अनेक क्रिकेट खेळणाऱ्या देशांनी पाकिस्तानातील क्रिकेट मालिकेला मनाई केली होती. यंदाच्या मालिकेसाठीही लंकेच्या दहा खेळाडूंनी मनाई केली आहे. या दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेसाठी श्रीलंकेच्या संघाचे नेतृत्व लाहिरू थिरीमाने याच्याकडे सोपवण्यात आले आहे. तर टी-२० मालिकेची धुरा दासुन शनाका याच्याकडे देण्यात आली आहे. श्रीलंकेचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यात ३ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामन्याची मालिका खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात २७ सप्टेंबरपासून होणार आहे.