मुंबई - कोरोनामुळे जगभरातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. तर दुसरीकडे श्रीलंका क्रिकेट बोर्डाने भारत आणि बांगलादेश यांच्यासोबत तिरंगी मालिका खेळवण्याची तयारी सुरू केली आहे. या संदर्भातील वृत्त एका संकेतस्थळाने दिले आहे.
श्रीलंकन क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी आधिकारी अॅश्ले डीसिल्वा यांनी संकेतस्थळाशी बोलताना सांगितले, 'आम्ही तिरंगी मालिकेबद्दल बीसीसीआय आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाला विनंती केली आहे. याबाबत त्यांच्याकडून सकारात्मक उत्तर येईल, याची आम्ही वाट पाहत आहेत.'
लंकन क्रिकेट बोर्डाने मालिका खेळवण्याची तयारी दाखवली असली तरी भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांमध्ये सध्या लॉकडाउन सुरू आहे. दोन्ही देशातील सरकारने आंतरराष्ट्रीय प्रवासाला बंदी घातली आहे. यामुळे ही मालिका होईल की नाही, हे पाहावे लागेल.
याआधी लंकन बोर्डाने, जून महिन्यात नियोजित भारत आणि श्रीलंका यांच्यातील ३ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळण्याची विनंती केली आहे.
हेही वाचा - VIDEO : डोन्ट यू वरी, बस ना घरी...; कोरोना व्हायरस जनजागृतीसाठी क्रिकेटपटूंचं गाणं
हेही वाचा - दुसऱ्यांच्या मदतीवर जगणाऱ्या देशासाठी काहीतरी कर अन् काश्मीरचा नाद सोड, रैनाने आफ्रिदीला सुनावलं