ETV Bharat / sports

कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने दिले १ कोटी

श्रीलंकेतही कोरोनाचा फैलाव झाला असून यावर उपाययोजना करण्यासाठी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने, २५ मिलियन श्रीलंका रुपये भारतीय चलनात विचार केल्यास १ कोटी रुपये सरकारला दिले आहेत.

author img

By

Published : Mar 24, 2020, 9:36 AM IST

Updated : Mar 24, 2020, 11:51 AM IST

sri lanka cricket board will give financial support to government to fight coronavirus
कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने सरकारला दिली 'इतक्या' कोटीची मदत

कोलंबो - चीनमधून सुरू झालेल्या कोरोना विषाणूचा संसर्ग आता जगभरातल्या १६६ हून अधिक देशांमध्ये पोहोचला आहे. जगभरात सुमारे २ लाखांहून अधिक लोकांना याची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून मृतांचा आकडा १५ हजारांवर पोहोचला आहे. प्रत्येक देश आपापल्या कुवतीनुसार यावर उपाययोजना करत आहे. श्रीलंकेतही कोरोनाचा फैलाव झाला असून यावर उपाययोजना करण्यासाठी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने, २५ मिलियन श्रीलंका रुपये भारतीय चलनात विचार केल्यास १ कोटी रुपये सरकारला दिले आहेत. श्रीलंका बोर्डाने याची घोषणा आपल्या संकेतस्थळावरून केली.

श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने सांगितले की, 'देशातील सर्व स्थानिक स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. आम्ही सरकारच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करत आहेत. आमचे खेळाडूही जनजागृतीसाठी चाहत्यांना आवाहन करत आहेत.'

दरम्यान, श्रीलंका बोर्डाने दिलेल्या मदतीबद्दल श्रीलंकेचे राष्ट्रपती महिंदा राजपक्षे यांनी ट्विटच्या माध्यमातून आभार मानले आहे. तसेच त्यांनी, कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये श्रीलंका बोर्डाने केलेली मदत कौतुकास्पद असून या लढाईमध्ये सर्वांचा सहभाग आवश्यक असल्याचे म्हटलं आहे. सरकारच्या मदत करणाऱ्या सर्व खेळाडूंचे आभारही राजपक्षे यांनी मानले आहेत.

हेही वाचा - उद्धव ठाकरेच्या संचारबंदीचे क्रिकेटपटूने केलं स्वागत

हेही वाचा - भारतीय क्रिकेटपटू म्हणतो, लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करायचं की, जेलमध्ये जायचं हे तुम्हीच ठरवा!

Last Updated : Mar 24, 2020, 11:51 AM IST

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.