शारजाह - हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना निर्धारीत २० षटकात ५ बाद २०८ धावा केल्या आहेत. रोहित शर्मा स्वस्तात बाद झाल्यानंतर क्विंटन डी कॉकने अर्धशतक (६७) झळकावले. डी कॉक बाद झाल्यानंतर हार्दिक आणि केरॉन पोलार्ड यांनी स्फोटक खेळी करत धावसंख्या वाढवली. अखेरच्या षटकात कृणाल पांड्याने धमकेदार फलंदाजी करत क्रिकेटप्रेमींना खुश केले.
हार्दिक पांड्या बाद झाल्यानंतर कृणाल पांड्या फलंदाजीसाठी आला. त्याला शेवटच्या षटकातील चार चेंडू खेळण्यास मिळाली. त्यावेळेला मुंबई दोनशेपार मजल मारते की नाही, अशी शंका होती. पण कृणालने पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर चौकार आणि डावाच्या अखेरच्या चेंडूवर षटकार लगावत मुंबईला २०८ धावांपर्यंत मजल मारून दिली. हे षटक वेगवान गोलंदाज सिद्धार्थ कौल याने टाकले. कृणालचा स्टाइट रेट तब्बल ५०० चा होता.
- ' class='align-text-top noRightClick twitterSection' data=''>
दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना रोहित ६ धावांवर बाद झाला. यानंतर डी कॉक आणि सूर्यकुमार यादव या डाव सावरला. सूर्यकुमार फटकेबाजीच्या प्रयत्नात १८ चेंडूत ६ चौकारांसह २७ धावा करून माघारी परतला. क्विंटन डी कॉकने अर्धशतक ठोकले. त्याने ६७ धावा (३९) केल्या. डी कॉक शिवाय, इशान किशन (३१), हार्दिक पांड्या (२८), पोलार्ड (२५*) आणि कृणाल पांड्या (२०*) यांनी छोटेखानी खेळी करत मुंबईला २०८ धावांची मजल मारून दिली. हैदराबादकडून सिद्धार्थ कौल आणि संदीप शर्मा यांनी २-२ गडी बाद केले. तर राशिदने एक गडी टिपला.
हेही वाचा - दिनेश कार्तिकने मॉर्गन, रसेल यांच्यानंतर फलंदाजीला यावं; दिग्गज खेळाडूचा सल्ला
हेही वाचा - IPL-2020 : कोलकाताविरुद्धच्या सामन्यात गब्बरचा अफलातून झेल.. पाहा व्हिडिओ