ETV Bharat / sports

वृद्धिमान साहाच्या तुफानी फटकेबाजीमुळे खास विक्रमाची नोंद - wriddhiman saha srh record

वृद्धिमान साहाने पॉवर प्लेच्या षटकांमध्ये सर्वोत्तम स्ट्राईक रेट असणाऱ्या फलंदाजांच्या यादीत त्याने स्थान मिळवले. आयपीएलच्या कारकिर्दीत पॉवरप्लेमध्ये किमान ४०० पेक्षा जास्त चेंडू खेळत त्याने १३७.५०च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या.

srh opener wriddhiman saha made batting records in ipl 2020
वृद्धिमान साहाच्या तुफानी फटकेबाजीमुळे खास विक्रमाची नोंद
author img

By

Published : Oct 28, 2020, 4:00 PM IST

Updated : Oct 28, 2020, 4:33 PM IST

दुबई - आयपीएलमध्ये दुबई येथे झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने दिल्ली कॅपिटल्सवर ८८ धावांनी विजय मिळवला. हा सामना जिंकत हैदराबादने गुणतालिकेत सहावा क्रमांक पटकावला आहे. या सामन्यात सलामीवीराची संधी मिळालेल्या वृद्धिमान साहाने ८७ धावांची खेळी करत दोन मोठ्या विक्रमांची नोंद केली.

वृद्धिमान साहाने पॉवर प्लेच्या षटकांमध्ये सर्वोत्तम स्ट्राईक रेट असणाऱ्या फलंदाजांच्या यादीत त्याने स्थान मिळवले. आयपीएलच्या कारकिर्दीत पॉवरप्लेमध्ये किमान ४०० पेक्षा जास्त चेंडू खेळत त्याने १३७.५०च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. शिवाय, १९०पेक्षा जास्तीच्या स्ट्राईक रेटने धावा काढत दोन्ही सलामीवीरांनी अर्धशतक करण्याचा विक्रमही केला. वॉर्नर आणि साहा अर्धशतके ठोकली. याआधी २०१६मध्ये ख्रिस गेल-विराट कोहली जोडीने तर २०१७मध्ये ख्रिस लीन-सुनील नरिन जोडीने असा पराक्रम केला होता.

  • Highest Strike Rate in first 6 overs in IPL (Min. 400 balls):

    155.11 - Buttler
    145.62 - Lynn
    144.16 - Sehwag
    137.95 - Warner
    137.50 - SAHA#IPL2020 #SRHvsDC

    — Bharath Seervi (@SeerviBharath) October 27, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हैदराबादची दिल्लीवर मोठी मात -

नाणेफेक गमावलेल्या प्रथम फलंदाजी करताना हैदराबादकडून डेव्हिड वॉर्नर आणि वृद्धिमान साहा या दोघांनीही शानदार खेळी केली. वॉर्नरने ३४ चेंडूत २ षटकार आणि ८ चौकारांच्या मदतीने ६६ धावा कुटल्या. वॉर्नरने २५ चेंडूत आपले अर्धशतक झळकावले. तर, साहाने ४५ चेंडूंचा सामना करताना ८७ धावा कुटल्या. यामध्ये २ षटकार आणि १२ चौकारांचा समावेश होता. पहिल्या विकेटसाठी वॉर्नर आणि साहाने १०७ धावांची धमाकेदार शतकी भागिदारी रचली.या दोघांच्या खेळीमुळे संघाने २ विकेट्स गमावत तब्बल २१९ धावांचा डोंगर दिल्लीपुढे उभारला होता. हैदराबादच्या गोलंदाजीसमोर हे आव्हान दिल्लीला पार करता आले नाही. त्यांचा डाव १३१ धावांवरच संपुष्टात आला.

Last Updated : Oct 28, 2020, 4:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.