नवी दिल्ली - आयपीएल २०२०मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळलेला स्टार फिरकीपटू वरुण चक्रवर्ती विवाहबंधनात अडकला आहे. वरुणने गर्लफ्रेंड नेहा खेडेकरशी चेन्नईमध्ये लग्न केले. हे लग्न यावर्षाच्या सुरुवातीला होणार होते, मात्र, कोरोनामुळे ते होऊ शकले नाही.

हेही वाचा - योगराज सिंग पुन्हा चर्चेत...दिग्दर्शकाने केली चित्रपटातून हकालपट्टी
लॉकडाउनची घोषणा झाली, तेव्हा वरुण आणि नेहा वेगवेगळ्या शहरात होते. वरुण चेन्नईत तर, नेहाने लॉकडाउन मुंबईत घालवले. यंदाच्या आयपीएलमध्ये वरुणने १३ सामन्यांत १७ गडी बाद केले. त्याने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध २० धावा देत ५ गडी बाद केले होते. आयपीएलमधील स्फोटक कामगिरीच्या जोरावर वरूणला ऑस्ट्रेलिया दौर्यासाठी टीम इंडियामध्ये स्थान मिळाले. मात्र, खांद्याच्या दुखापतीमुळे तो यूएईहून भारतात परतला.

लिस्ट-ए पदार्पण -
वरुणने २०१८-१९मध्ये विजय हजारे ट्रॉफीमध्ये तामिळनाडूसाठी लिस्ट-ए क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्या मोसमात तो त्याच्या संघासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. त्याने ९ सामन्यांत २२ बळी घेतले होते.