केप टाऊन - दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात खेळला गेलेल्या पहिल्या सामन्यात सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळाला. या सामन्यात आफ्रिकेने नाणेफेक जिंकून श्रीलंकेला प्रथम फलंदाजीस पाचारण केले. श्रीलंकेकडून मेंडीसने केलेल्या ४१ धावा वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. त्यामुळे निर्धारीत २० षटकांमध्ये श्रीलंकन संघ ७ विकेट गमावत १३४ धावा करु शकला.
#CSAnews Proteas need #superover to win first T20 International https://t.co/kO6APcNaE4#ProteaFire #SAvSL pic.twitter.com/GcQiApi6xo
— Cricket South Africa (@OfficialCSA) March 19, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#CSAnews Proteas need #superover to win first T20 International https://t.co/kO6APcNaE4#ProteaFire #SAvSL pic.twitter.com/GcQiApi6xo
— Cricket South Africa (@OfficialCSA) March 19, 2019#CSAnews Proteas need #superover to win first T20 International https://t.co/kO6APcNaE4#ProteaFire #SAvSL pic.twitter.com/GcQiApi6xo
— Cricket South Africa (@OfficialCSA) March 19, 2019
आव्हानाचा पाठलाग करायला उतरलेल्या दक्षिण आफ्रिकन फलंदाजांची श्रीलंकेच्या गोलंदाजांनी भंबेरी उडवली. डेव्हिड मिलरच्या ४१ आणि दुस्सेनच्या ३४ धावा वगळता कोणत्याही आफ्रिकन फलंदाजास खेळपट्टीवर जास्त काळ टीकता आले नाही. श्रीलंकेकडून कर्णधार लसिथ मलिंगाने शानदार गोलंदाजी करत ४ षटकांच्या मोबदल्यात ११ धावा देत २ गडी माघारी धाडले.
श्रीलंकेच्या वेगवान माऱ्यासमोर दक्षिण आफ्रिकेचा संघ हतबल दिसला. आफ्रिकेला अखेरच्या चेंडूवर विजयासाठी २ धावांची गरज होती, मात्र त्यांना एकच धाव घेता आल्याने सामना टाय झाला. यांनतर सामन्याचा निर्णय सुपर ओव्हरद्वारे घेण्यात आला.
सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने ६ चेंडूत १४ धावा केल्या. कर्णधार लसिथ मलिंगाच्या गोलंदाजीवर डेव्हिड मिलरने १ षटकार आणि १ चौकार खेचला. प्रत्युत्तरात मैदानात आलेले श्रीलंकंन फलंदाज इम्रान ताहीरच्या तालावर नाचताना दिसले.विजयासाठी १५ धावा हव्या असताना श्रीलंकेच्या फक्त ५ धावा झाल्या.