ETV Bharat / sports

दक्षिण आफ्रिका जाणार आयर्लंड दौऱ्यावर, खेळणार 'इतके' सामने - दक्षिण आफ्रिका आयर्लंड दौरा लेटेस्ट न्यूज

११ ते २५ जुलै दरम्यान या मालिकेचे सामने खेळविण्यात येणार असून आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीगचा (सीडब्ल्यूसीएसएल) भाग असणार्‍या तीन एकदिवसीय सामन्यांचा यात समावेश आहे. यासह या मालिकेत तीन टी-२० सामने खेळले जातील. मॅलाहाइड आणि स्टॉर्मोंट येथे सामने खेळले जातील.

दक्षिण आफ्रिका जाणार आयर्लंड दौऱ्यावर
दक्षिण आफ्रिका जाणार आयर्लंड दौऱ्यावर
author img

By

Published : Feb 16, 2021, 7:10 AM IST

जोहान्सबर्ग - दक्षिण आफ्रिकेचा संघ जुलैमध्ये आयर्लंड दौर्‍यावर जाणार आहे. या दौऱ्यात उभय संघ तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामने खेळतील. क्रिकेट दक्षिण आफ्रिकाने (सीएसए) ही माहिती दिली.

११ ते २५ जुलै दरम्यान या मालिकेचे सामने खेळविण्यात येणार असून आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीगचा (सीडब्ल्यूसीएसएल) भाग असणार्‍या तीन एकदिवसीय सामन्यांचा यात समावेश आहे. यासह या मालिकेत तीन टी-२० सामने खेळले जातील. मॅलाहाइड आणि स्टॉर्मोंट येथे सामने खेळले जातील.

हेही वाचा - भारतासाठी दोन टी-२० सामने खेळणाऱ्या क्रिकेटपटूची निवृत्ती

सीएसएने म्हटले आहे की, दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्यांदा एकापेक्षा जास्त सामन्यांसाठी आयर्लंडचा दौरा करेल. त्यापूर्वी जून २००७ मध्ये आफ्रिकेने बेलफास्टमध्ये एकदिवसीय सामना खेळला होता. त्यांनी आतापर्यंत पाच एकदिवसीय सामन्यात आयर्लंडचा पराभव केला आहे. दोन्ही संघांनी अद्याप आपापसात एकही टी-२० सामना खेळलेला नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.