लाहोर - पाकिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ लाहोरला पोहोचला आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने ट्विट करत याची माहिती दिली.
दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात दोन सामन्याची कसोटी मालिका खेळवली जात आहे. यातील पहिला सामना यजमान पाकिस्तान संघाने जिंकला. दुसऱ्या सामन्याला रावळपिंडीमध्ये उद्यापासून (गुरूवार ता. ४) सुरूवात होणार आहे. यानंतर उभय संघात टी-२० मालिका खेळली जाणार आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेने युवा खेळाडूंना संघात स्थान दिले आहे. हे खेळाडू उभय संघातील मालिकेसाठी लाहोरमध्ये दाखल झाले आहेत.
क्रिकेट आफ्रिकेने या संदर्भात एक ट्विट केले आहे. टचडाऊन लाहोर, दक्षिण आफ्रिकेचा टी-२० संघ पाकिस्तानविरुद्ध मालिका खेळण्यासाठी सुरक्षित दाखल झाला आहे, असे ट्विटमधून आफ्रिकेने म्हटलं आहे.
दरम्यान, पाकविरूद्धच्या टी-२० मालिकेत हेनरिक क्लासेन पहिल्यादांच आफ्रिकेच्या संघाचे नेतृत्व करणार आहे. उभय संघात तीन सामन्याची मालिका खेळली जाणार असून या मालिकेला ११ फेब्रुवारीपासून सुरूवात होईल.
असा आहे पाकिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी आफ्रिकेचा संघ -
हेनरिक क्लासेन (कर्णधार), नंद्रे बर्गर, ओकुहेल सेले, जूनियर डाला, ब्योर्न फोर्टुइन, रीजा हेंड्रिक, जॉर्ज लिंडे, जन्नान मल्हान, डेविड मिलर, एंडिले फेहलुकवेओ, ड्वेन प्रेटोरियस, रेयान रिकाल्टन, तबरेज शम्सी, लूथो सिपामला, जॉन-जॉन स्मट्स, पाइट वैन बिलजोन, ग्लेंटन स्टुअरमैन आणि जॅक्स स्नीमैन.
हेही वाचा - ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघाचा विजय उल्लेखनीय; विल्यमसनकडून टीम इंडियाचे कौतूक
हेही वाचा - WTC : फायनलचे तिकीट पक्के केल्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार विल्यमसन म्हणाला...