मुंबई - श्रीलंका क्रिकेट बोर्डापाठोपाठ दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाने भारतीय संघाविरुध्द मालिका खेळण्यासाठी इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी ऑगस्ट महिन्यात ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी, भारतीय संघाला आफ्रिका दौऱ्यासाठी निमंत्रण दिलं आहे.
याविषयी दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाचे हंगामी कार्यकारी अध्यक्ष जॅक फॉल यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं, की 'भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याबद्दल क्रिकेट साऊथ आफ्रिका आणि बीसीसीआय या दोन्ही बोर्डांमध्ये चर्चा सुरू आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाचे संचालक ग्रॅमी स्मिथ आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यात फेब्रुवारी महिन्यात याविषयी चर्चा झाली होती. यानंतर २० मे रोजी दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये टेलि-कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा झाली. आम्ही या मालिकेबाबत आशादायी आहोत.'
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ३ एकदिवसीय सामन्याची मालिका खेळण्यासाठी भारत दौरा केला होता. उभय संघातील धर्मशाळा येथील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. यानंतर भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरूवात झाली. यामुळे उर्वरित दोन सामने बीसीसीआयने रद्द केले. त्यामुळे एकही सामना न खेळता दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतामधून माघारी परतला होता.
दरम्यान, आफ्रिका बोर्डाने ऑगस्ट महिन्यात ठेवलेला टी-२० मालिकेचा प्रस्ताव आयसीसीच्या नियमानुसार नाही. यामुळे हा दौरा होईल की याबाबत शंका आहे.
हेही वाचा - ऑक्टोबरमध्ये आयपीएल शक्य, बीसीसीआय कार्यकारिणी सदस्यांचे मत
हेही वाचा - आयपीएल 2020 बाबत बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरींनी दिली महत्वपूर्ण अपडेट, वाचा काय म्हणाले...