दुबई - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आज (मंगळवार) २०१९ मधील सर्वोत्तम एकदिवसीय आणि टी-२० खेळाडूंच्या संघाची घोषणा केली. या दोनही संघात भारताच्या स्मृती मानधनाचा समावेश आहे. महत्वाचे म्हणजे, स्मृतीसह भारताच्या सहा खेळाडूंचा समावेश या संघात आहे.
आयसीसीने महिला खेळाडूंच्या वर्षभरातील प्रदर्शनावर सर्वोत्तम संघ निवडला. एकदिवसीय संघात भारताच्या स्मृती मानधना, शिखा पांडे, झुलन गोस्वामी आणि पूनम यादव यांचा समावेश आहे. तर टी-२० संघात स्मृती मानधना, दीप्ती शर्मा, राधा यादव यांनी आपल्या दमदार कामगिरीने जागा पटकावली आहे. आयसीसीच्या २०१९ मधील एकदिवसीय आणि टी-२० संघाचे नेतृत्व ऑस्ट्रेलियाच्या मेग लॅनिंगकडे सोपवण्यात आले आहे.
ऑस्ट्रेलियाच्या एलिसा पेरीने एकदिवसीय आणि अॅलिसा हिलीने टी-२० तील सर्वोत्तम खेळाडूचा मान पटकावला. तर सर्वोत्तम खेळाडू एलिसा पेरी ठरली. उदयोन्मुख खेळाडूचा पुरस्कार थायलंडच्या चनिदा सथिरुंगने पटकावला.
- आयसीसीचा एकदिवसीय संघ -
- मेग लॅनिंग, कर्णधार (ऑस्ट्रेलिया), अॅलिसा हिली ( ऑस्ट्रेलिया), स्मृती मानधना ( भारत), तम्सीन बीयूमोंट ( इंग्लंड), स्टेफनी टेलर ( वेस्ट इंडीज), एलिसा पेरी ( ऑस्ट्रेलिया), जेस जोनासेन ( ऑस्ट्रेलिया ), शिखा पांडे ( भारत), झुलन गोस्वामी ( भारत), मीगन स्कट ( ऑस्ट्रेलिया), पूनम यादव ( भारत).
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
- आयसीसीचा टी-२० संघ -
अॅलिसा हिली ( ऑस्ट्रेलिया), डॅनिएल वॅट ( इंग्लंड), मेग लॅनिंग, कर्णधार ( ऑस्ट्रेलिया), स्मृती मानधना ( भारत), लिझली ली ( दक्षिण आफ्रिका), एलिसा पेरी ( ऑस्ट्रेलिया), दीप्ती शर्मा ( भारत), निदा दार ( पाकिस्तान), मीगन स्कट ( ऑस्ट्रेलिया), शबनीम इस्मैल ( दक्षिण आफ्रिका), राधा यादव ( भारत).- View this post on Instagram
Here's the ICC Women's T20I Team of the Year, with Meg Lanning as the captain. #ICCAwards
">
-