अबुधाबी - यूएईच्या कठीण खेळपट्टीवर आघाडीच्या फलंदाजीला ताकद पुरवण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्सचा (केकेआर) युवा फलंदाज शुबमन गिल संपूर्ण आयपीएलमध्ये डावाची सुरुवात करेल. कोलकाता नाईट रायडर्सचा मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलमने हा खुलासा केला.
गत मोसमात उदयोन्मुख खेळाडू शुबमनला संघात विविध क्रमांकावर खेळवण्यात आले. पण, त्याने चांगली कामगिरी केली नाही. कोलकाताला प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवण्यातही अपयश आल्याचे हे एक कारण असल्याचे बोलले जात होते.
मॅक्युलम म्हणाला, "खेळपट्टी खूपच ताजी असेल, ती वेगवान गोलंदाजीसाठी उपयुक्त ठरेल. त्यामुळे तेथे तंत्रशुद्ध फलंदाजाची गरज आहे. शुबमन अशाच फलंदाजांपैकी एक आहे. मला संपूर्ण स्पर्धेत त्याला अव्वल क्रमवारीत फलंदाजी करताना पाहण्यास आवडेल." २३ सप्टेंबरपासून केकेआर अबुधाबी येथे गतविजेत्या मुंबई इंडियन्सविरूद्ध आपली आयपीएल मोहीम सुरू करणार आहे.
आयपीएलच्या तेराव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. पहिल्या सामन्यात अंबाती रायडू आणि फाफ डु प्लेसिस यांच्या शतकी भागीदारीमुळे चेन्नई सुपर किंग्जने गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा पाच गडी राखून पराभव केला.