नवी दिल्ली - भारताचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्यामध्ये अद्यापही 'धुसफूस' असल्याचे दिसून येत आहे. वेस्ट इंडिजविरुध्दचा दुसरा टी-२० सामना संपल्यानंतर भारतीय संघ फ्लोरिडा सोडण्यापूर्वी विंडिजच्या खेळाडूंना हस्तादोलन करण्यासाठी एकत्रित आला. यावेळी रोहित आणि कोहली यांनी एकमेकांना न पाहणेच पसंत केले. सध्या हा व्हिडिओ सोशल मडियावर व्हायरल होत आहे.
- View this post on Instagram
And that's a wrap from Florida 💙💙 We now head to Guyana next ✈️ #TeamIndia #WIvIND
">
विश्वकरंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताला न्यूझीलंडकडून पराभव पत्कारावा लागला. या सामन्यानंतर कर्णधार कोहली आणि रोहित शर्मा यांच्यामध्ये वाद असल्याचे वृत्त माध्यमांनी प्रसारित केले. याच दरम्यान, रोहित संपूर्ण संघाला इंग्लंडमध्ये सोडून आपल्या पत्नीसह भारतात परतला. तसेच त्याने विराटसह त्याची अभिनेत्री पत्नी अनुष्का शर्माला सोशल मीडियावर अनफॉलो केले होते.
दरम्यान, वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वी कर्णधार विराट कोहलीने पत्रकार परिषदेत आमच्यात दुरावा नसल्याचे सांगत माध्यम टीआरपीसाठी अफवा पसरवत असल्याचे सांगितले. त्यानंतर सगळं काही सुरुळीत असल्याचे बोलले जात होते. तेव्हा रोहितने मी संघासह देशासाठी खेळत असल्याचे ट्विट केले. हा एकप्रकारे कोहलीला टोमणा असल्याचा अंदाज क्रिकेट चाहत्यांमधून वर्तवण्यात आला.
आता पुन्हा दोघांमध्ये सगळं काही सुरळीत नसल्याचे दिसून येत आहे. इंडियन क्रिकेट टीमने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सुरुवातीला रोहित शर्मा विंडिजच्या खेळाडूंना भेटतो. त्यानंतर शिखर धवन खेळाडूंशी हस्तादोलन करतो. यानंतर काही सेंकदात विराट कोहली तिथे येते. तोही खेळाडूंशी हस्तादोलन करतो. मात्र रोहित परतत असताना दोघेही एकमेकांकडे पाहत नसल्याचे दिसून येत आहे.