ETV Bharat / sports

U१९ WC राडा : बदला घ्यायचा होता, यामुळं आम्ही 'ते' केलं, बांगलादेशी खेळाडूची कबुली - 19 वर्षांखालील विश्व करंडक स्पर्धा भारत विरुद्ध बांगलादेश

बांगलादेशच्या विजयात मोलाची भूमिका बजावलेला शोरिफूल इस्लामने, आम्हाला बदला घ्यायचा होता. यामुळे आम्ही त्या पद्धतीने सेलिब्रेशन केले असल्याचे म्हटलं आहे.

u 19 world cup final : shoriful islam reveals the reason behind celebration post u 19 world cup final against india
U१९ WC राडा : बदला घ्यायचा होता, यामुळं आम्ही 'ते' केलं, बांगलादेशी खेळाडूची कबुली
author img

By

Published : Feb 17, 2020, 1:11 PM IST

Updated : Feb 17, 2020, 1:18 PM IST

मुंबई - आयसीसी विश्व करंडक स्पर्धेचा अंतिम सामना संपल्यानंतर भारत आणि बांगलादेश संघातील खेळाडूंमध्ये भरमैदानात राडा झाला. या प्रकरणात आयसीसीने बांगलादेशचे ३ तर भारताच्या दोन खेळाडूंवर कारवाई केली. दरम्यान, बांगलादेशच्या विजयात मोलाची भूमिका बजावलेला शोरिफूल इस्लामने, आम्हाला बदला घ्यायचा होता. यामुळे आम्ही त्या पद्धतीने सेलिब्रेशन केले असल्याचे म्हटलं आहे.

शोरिफूलने एका इंग्रजी वृत्तापत्राशी बोलताना सांगितले की, 'विश्व करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्याआधी भारताने आम्हाला महत्वाच्या सामन्यात दोन वेळा पराभूत केले होते. त्यावेळी त्यांनी अशाच पद्धतीने सेलिब्रेशन केले होते. आम्ही अंतिम सामन्यात उतरताना त्या सेलिब्रेशनचा बदला घेण्याचा निर्धार केला होता. आम्ही अखेरच्या चेंडूवर लढलो आणि विजय मिळवला. त्यानंतर भारताने जसा यापूर्वी सेलिब्रेशन केले होते त्याच पद्धतीने आम्हीही सेलिब्रेशन केले. आम्हाला भारतीय संघाला याची जाणीव करून द्यायची होती की, जेव्हा विजय संघ पराभव झालेल्या संघाला चिढवतो, तेव्हा त्यांना काय वाटते.'

u 19 world cup final : shoriful islam reveals the reason behind celebration post u 19 world cup final against india
भारत-बांगलादेश संघातील खेळाडू एकमेकांना भिडले तो क्षण

काय आहे प्रकरण -

विश्व करंडक स्पर्धेचा अंतिम सामना डकवर्थ नियमाने जिंकल्यानंतर बांगलादेशचे खेळाडू जल्लोष करण्यासाठी मैदानावर धावून आले. यातील काही खेळाडूंनी भारतीय खेळाडूंना पाहून आक्षेपार्ह इशारे केले. यादरम्यान, दोन्ही संघाच्या खेळाडूंमध्ये बाचाबाची झाली. यात बांगलादेशच्या झेंड्याचेही नुकसान झाले. वेळीच पंचांच्या मध्यस्थी करत वाद सोडवला होता.

  • Amazing scenes here in Potchefstroom as Bangladesh pull off a miraculous victory and are the u/19 world champions.. well fought india.. standard of cricket today and throughout this tournament has been world class.. congrats Bangladesh #U19WorldCup #FutureStars pic.twitter.com/JD7re0KLo2

    — JP Duminy (@jpduminy21) February 9, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

या प्रकरणात आयसीसीने दोषी ठरवलेले खेळाडू -

मोहम्मद तोवहीद हृदय, शमीम होसैन आणि रकिबुल हसन या बांगलादेशी खेळाडूंसह आकाश सिंग व रवी बिश्नोई या दोन भारतीय खेळाडूंना आयसीसीने दोषी ठरवले.

आयसीसीने ही कारवाई केली -

या प्रकरणात बांगलादेशचा दोषी खेळाडू हृदयला दहा निलंबन गुण मिळाले आहेत आणि दोन वर्षांसाठी हे गुण त्याच्या नावावर कायम राहणार आहेत. शमीमला ८, तर रकिबुलला ४ निलंबन गुण देण्यात आले आहेत. भारताच्या आकाश सिंगला ८ निलंबन गुण, तर रवीला ५ निलंबन गुण देण्यात आले आहेत. याशिवाय बिश्नोईला कलम २.५ चा भंग केल्याने, अतिरिक्त २ निलंबन गुण देण्यात आले आहेत.

दरम्यान, भारताने याआधी बांगलादेशला २०१८ मध्ये आशिया चषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पराभूत केले होते. तसेच भारताने २०१९ च्या आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बांगलादेशला धूळ चारत विजेतेपद पटकावले होते.

Last Updated : Feb 17, 2020, 1:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.