ETV Bharat / sports

'व्हेंटिलेटर देऊ, तुम्ही दहशतवादी सोपवणार का?' नेटीझन्सचा शोएबला सवाल

शोएबच्या व्हेंटिलेटर मागणीच्या विनंतीनंतर नेटिझन्सने त्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. एका युजरने, भारत तुम्हाला १० हजार व्हेटिंलेटर देईल, त्या बदल्यात तुम्ही भारताला १० हजार दहशतवादी सोपवणार का? असा सवाल केला आहे.

shoaib akhtar urged india for 10 thousand ventilators for pakistan indians trolled him
व्हेंटिलेटर देऊ, तुम्ही दहशतवादी सोपवणार का? नेटीझन्सचा शोएबला सवाल
author img

By

Published : Apr 9, 2020, 7:55 PM IST

मुंबई - कोरोनाच्या संकटात पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने भारताला मदतीसाठी आर्त साद घातली आहे. त्याने भारताने पाकिस्तानसाठी १० हजार व्हेटिंलेटर बनवून दिल्यास, पाकिस्तान हे उपकार कधीच विसरणार नाही, असे सांगितले. शोएबच्या या विनंतीनंतर नेटिझन्सने त्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. एका युजरने, भारत तुम्हाला १० हजार व्हेटिंलेटर देईल, त्या बदल्यात तुम्ही भारताला १० हजार दहशतवादी सोपवणार का? असा सवाल केला आहे.

भारतामध्ये कोरोनाचा विळखा घट्ट होताना दिसत आहे. या घडीला देशात कोरोनाचे ५८६५ रुग्ण आहेत. तर १६९ लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे. पाकिस्तानमध्येही कोरोनाने हाहाकार माजवला आहे. अशा स्थितीत पाकिस्तान दुसऱ्या देशांना मदत मागत आहे. त्यांची परिस्थिती इतकी वाईट आहे की, डॉक्टरांकडे उपचार करण्यासाठी किट देखील नाहीत. याच पार्श्वभूमीवर शोएबने त्यांच्या यू-ट्यूब चॅनलच्या माध्यमातून कोरोनाच्या संकटात, भारताने जर पाकिस्तानला १० हजार व्हेंटिलेटर बनवून दिल्यास, पाकिस्तान हे उपकार कधीच विसरणार नाही, असे सांगितले.

पण, शोएबच्या विनंतीवर भारतीय नेटीझन्स संतापले आहेत. एका ट्विटर यूझरने, चीनकडे मदत माग, असा सल्ला दिला आहे. तर एकाने, भारत तुम्हाला १० हजार व्हेटिंलेटर देईल, त्या बदल्यात तुम्ही भारताला १० हजार दहशतवादी सोपवणार का? असा सवाल केला आहे. काही नेटिझन्सनी तर त्याला पाकिस्तान सरकार आणि पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरील विश्वास उडाला का, असा तिखट सवाल केला आहे.

  • Shoaib Akhtar you should proposed your dearest friend China to raise funds for fight against #CoronavirusPandemic. China-Pak Test Cricket series is better option for you.

    — SUKANTA GANGULY (@sukanta_ganguly) April 9, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
shoaib akhtar urged india for 10 thousand ventilators for pakistan indians trolled him
नेटीझन्सनी केलेले ट्विट

हेही वाचा - कोरोना : पाकिस्तान सरकार हतबल; अख्तरने मागितली भारताकडे मदत

हेही वाचा - विराटशी पंगा घेऊ नका, पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूचा गोलंदाजांना सल्ला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.