ETV Bharat / sports

शोएब अख्तरने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला म्हटले ‘नालायक’! - Shoaib akhtar on umar akmal news

अख्तर म्हणाला, “उमर आपल्या चुकांमुळे ओळखला जातो. तो सहा महिन्यांत असे काहीतरी करतो जे वादग्रस्त असते.” त्यानंतर ऑनलाइन सट्टेबाजीला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) मान्यता दिली असल्याचेही अख्तरने उघडकीस आणले आहे.

Shoaib akhtar furious on pcb calls board ineffective
शोएब अख्तरने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला म्हटले ‘नालायक’!
author img

By

Published : Apr 29, 2020, 7:31 PM IST

नवी दिल्ली - पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) लाचलुचपत प्रतिबंधक संहितेचा भंग केल्याबद्दल पाकिस्तान संघाचा फलंदाज उमर अकमलला ३ वर्षाच्या बंदीची शिक्षा दिली. माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने या प्रकरणावर उघडपणे भाष्य केले आहे. त्याने आपल्या यूट्यूब वाहिनीवर आपल्याच देशाच्या क्रिकेट बोर्डाला जोरदार फटकारले असून त्याने बोर्डाला नालायकदेखील म्हटले आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

अख्तर म्हणाला, “उमर आपल्या चुकांमुळे ओळखला जातो. तो सहा महिन्यांत असे काहीतरी करतो जे वादग्रस्त असते.” त्यानंतर ऑनलाइन सट्टेबाजीला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) मान्यता दिली असल्याचेही अख्तरने उघडकीस आणले आहे.

तो पुढे म्हणाला, “पीसीबीने आयडब्ल्यूटी नावाच्या कंपनीला पाकिस्तानी सुपर लीग (पीएसएल) ऑनलाइन स्ट्रीमिंगचे अधिकार दिले आहेत, जे टी -२० लीगचे जगभरात प्रसारण करतात. त्यांच्या करारामध्ये असे लिहिले आहे, की सामन्यादरम्यान सट्टेबाजी होऊ शकते. नालायक बोर्डाचा कायदा विभाग काही कामाचा नाही. जर बोर्डाचे संविधान याला मंजुरी देऊ शकत नाही. यामुळे बोर्ड आणि इस्लाम दोन्ही कमकुवत झाले आहेत.”

“बोर्ड मजा करत आहे. त्यांचे अधिकारी आंधळे आहेत. आमच्या सामन्यांची ऑनलाईन सट्टेबाजी चालू होती, फिक्सिंग चालू आहे आणि हे आम्हाला माहित नव्हते. पीएसएलच्या ६ फ्रँचायझींनाही माहिती नव्हती. लाज राखा, देवाचा आदर करा. आपल्याला फिक्सिंग थांबवायची असेल तर शिक्षा म्हणून तुरूंगात पाठवले पाहिजे”, असेही अख्तरने म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.