ETV Bharat / sports

शोएब अख्तर म्हणतो, ''प्रेक्षकांशिवाय क्रिकेट म्हणजे नवरीशिवाय लग्न'' - crowdless cricket akhtar news

शोएब म्हणाला, "रिकाम्या स्टेडियममध्ये क्रिकेट खेळणे व्यवहारी आणि टिकाऊ असू शकते. परंतु आपण त्याचे मार्केटिंग करू शकतो, असे मला वाटत नाही. रिकाम्या स्टेडियममध्ये क्रिकेट खेळणे म्हणजे नवरीशिवाय लग्न करण्यासारखे आहे, हा खेळ खेळण्यासाठी गर्दी आवश्यक आहे. कोरोनाची परिस्थिती एका वर्षात सामान्य होईल अशी माझी अपेक्षा आहे."

shoaib akhtar commented over crowdless cricket
शोएब अख्तर म्हणतो, ''प्रेक्षकांशिवाय क्रिकेट म्हणजे नवरीशिवाय लग्न''
author img

By

Published : May 19, 2020, 7:43 AM IST

लाहोर - प्रेक्षकांशिवाय क्रिकेट हे नवरीशिवाय लग्न करण्यासारखे आहे. त्यामुळे क्रिकेटमध्ये मजा राहणार नाही आणि याचे मार्केटिंग करणे कठीण होईल, असे पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने म्हटले आहे. एका अॅपवर झालेल्या लाइव्ह सत्रात अख्तरने आपली भूमिका मांडली.

शोएब म्हणाला, "रिकाम्या स्टेडियममध्ये क्रिकेट खेळणे व्यवहारी आणि टिकाऊ असू शकते. परंतु आपण त्याचे मार्केटिंग करू शकतो, असे मला वाटत नाही. रिकाम्या स्टेडियममध्ये क्रिकेट खेळणे म्हणजे नवरीशिवाय लग्न करण्यासारखे आहे हा खेळ खेळण्यासाठी गर्दी आवश्यक आहे. कोरोनाची परिस्थिती एका वर्षात सामान्य होईल, अशी माझी अपेक्षा आहे."

2003च्या विश्वकरंडक स्पर्धेत सचिन तेंडुलकरला बाद केल्यामुळे आपण दु:खी असल्याचेही अख्तरने म्हटले आहे. सचिनचे शतक दोन धावांनी हुकले होते. भारताने सामना सहा विकेट्सने जिंकला.

शोएब म्हणाला, "मी खूप दुःखी होतो कारण सचिन 98 धावांवर बाद झाला होता. ही एक विशेष खेळी होती आणि त्याने शतक ठोकले पाहिजे होते. त्याने शतक करावे असे मला वाटत होते. माझ्या बाऊन्सरवर त्याने षटकार मारला असता तर मला आनंद झाला असता. यापूर्वी त्याने केले होते." सचिनने 75 चेंडूत केलेल्या या खेळीत 12 चौकार आणि एक षटकार खेचला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.