दुबई - शिखर धवनने आयपीएलच्या तेराव्या हंगामात सलग दोन शतकं झळकावत अनोख्या विक्रमाला गवसणी घातली. यानंतरच्या पुढील सामन्यात तो सपशेल अपयशी ठरला. धवनची मागील तीन सामन्यांतील कामगिरी अत्यंत खराब ठरली.
धवनने चेन्नईविरुद्ध नाबाद १०१ धावांची खेळी केली. त्यानंतर त्याने हाच धडाका कायम ठेवत पंजाबविरुद्ध नाबाद १०६ धावांची खेळी साकारली. या दोन सामन्यानंतर तो तीन सामन्यांत अपयशी ठरला.
कोलकाता विरुद्धच्या सामन्यात तो ६ धावांवर बाद झाला. तर हैदराबादविरुद्धच्या सामन्यात संदीप शर्माच्या गोलंदाजीवर पहिल्याच चेंडूवर गोल्डन डक झाला. यानंतर ५१व्या सामन्यात मुंबईविरुद्ध त्याला भोपळाही फोडता आला नाही. तो ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर सिल्वर डक होऊन माघारी परतला.
शिखरने या हंगामात १३ सामने खेळला आहेतॉ. यात त्याने ४७.१० च्या सरासरीने ४७१ धावा केल्या आहेत. यात दोन शतक आणि दोन अर्धशतकाचा समावेश आहे.
हेही वाचा - DC VS MI : मुंबईचं बलाढ्य आव्हान पेलत प्ले ऑफ फेरी गाठण्याचे दिल्लीचं लक्ष्य
हेही वाचा - Live DC vs MI : मुंबईच्या तिखट माऱ्यासमोर दिल्लीची दाणादाण, ६२ धावात निम्मा संघ माघारी