ETV Bharat / sports

शेन वॉटसनची 'बीग बॅश' लीगमधून निवृत्तीची घोषणा - Australia

कुटुंबाला वेळ देता यावा, यासाठी बीबीएलमधून निवृत्ती घेण्याचा वॉटसन निर्णय

शेन वॉटसन
author img

By

Published : Apr 26, 2019, 2:18 PM IST

नवी दिल्ली - आयपीएलमधील सर्वात बलाढ्य असलेल्या चेन्नई सुपर किंग्स संघाचा सलामीवीर फलंदाज शेन वॉटसनने आपल्या देशातील स्थानिक टी-२० लीग स्पर्धा बीग बॅश लीगमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ३७ वर्षीय शेन वॉटसन बीग बॅश लीगमध्ये सिडनी थंडर्स या संघाचे प्रतिनीधीत्व करायचा.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून २०१६ साली निवृत्ती घेणारा वॉटसन बीबीएलमध्ये आतापर्यंत ४ मोसम खेळला आहे. त्याने बीबीएलमध्ये ४२ सामने खेळताना १ हजार ५६ धावा केल्या आहेत. तसेच ४२ विकेटही आपल्या नावावर केले आहेत.

शेन वॉटसन
शेन वॉटसन

आपल्या कुटुंबाला वेळ देता यावा यासाठी मी बीबीएलमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्याचे वॉटसन म्हणाला. मात्र आयपीएलमध्ये आणि अन्य देशांच्या लीगमध्ये मी खेळतच राहणार असल्याचेही वॉटसन यावेळी स्पष्ट केले आहे.

जागतिक स्तरावर वॉटसन हा एक नावाजलेला फलंदाज आहे. त्याने १९० एकदिवसीय, ५९ कसोटी आणि ५८ टी-२० सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियन संघाचे प्रतिनीधीत्व केले आहे. तसेच २०१५ च्या विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियन संघाचा तो प्रमुख भाग होता.

Intro:Body:

Dummy

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.