मेलबर्न - कोरोना व्हायरसचे परिणाम संपूर्ण जगात उमटत असताना क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गज व्यक्तींनाही कोरोनाची लागण झाली आहे. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू लोकांच्या मदतीला धावून आला आहे. या क्रिकेटपटूच्या मालकीच्या कंपनीने सॅनिटायझर्स बनवण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा - भारताचे दिग्गज माजी फुटबॉलपटू प्रदीप कुमार बॅनर्जी यांचे निधन
ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्नची 'सेवन झिरो एट गिन' (seven zero eight gin) ही मद्य उत्पादन घेणारी कंपनी आता सॅनिटायझर्स बनवणार आहे. या सॅनिटायझर्समध्ये अल्कोहोलचे प्रमाण ७० टक्के असेल. आणि या सॅनिटायझर्सचा पुरवठा ऑस्ट्रेलियातील रुग्णालयात करण्यात येणार आहे.
'ऑस्ट्रेलियाच्या लोकांसाठी ही एक अतिशय आव्हानात्मक परिस्थिती आहे. हा रोग टाळण्यासाठी आणि लोकांना वाचवण्यासाठी आपल्या आरोग्य यंत्रणेला मदत करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजे', असे वॉर्नने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
- View this post on Instagram
So proud of the team ! Bloody awesome guys - well done to all @708gin ❤️
">
शेन वॉर्नवर आली घर विकण्याची वेळ -
शेन वॉर्नने मेलबर्न येथील आपले अलिशान घर विकण्याचा निर्णय घेतला आहे. वॉर्नच्या घराचा लिलाव ४ एप्रिल रोजी होणार आहे. वॉर्नने हे घर २००८ मध्ये अॅस्सेनडन फुटबॉल क्लबचा दिग्गज खेळाडू मॅथ्यू लॉयड याच्याकडून ५.४ मिलियन डॉलर म्हणजे जवळपास ४० कोटींना विकत घेतले होते. वॉर्नच्या बाबतीत सांगायचे झाल्यास, तो १४५ कसोटीत ७०८ गडी बाद करणारा दिग्गज गोलंदाज आहे. तो नेहमी त्याच्या स्टायलिश राहणीमानामुळे चर्चेत असतो.