कटक - कटकच्या बाराबती क्रिकेट स्टेडियमवर भारत विरूद्ध विंडीज यांच्यात अखेरचा एकदिवसीय सामना रंगला आहे. या सामन्यात भन्नाट फॉर्मात असलेल्या विंडीजचा सलामीवीर शाई होपने नवा विक्रम रचत विंडीजचे दिग्गज माजी फलंदाज विवियन रिचर्ड्स यांना मागे टाकले.
-
@ShaidHope becomes the 2️⃣nd FASTEST player EVER to reach 3️⃣0️⃣0️⃣0️⃣ ODI runs! #MenInMaroon🌴 #ItsOurGame #INDvWI pic.twitter.com/V1USrjdSpK
— Windies Cricket (@windiescricket) December 22, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">@ShaidHope becomes the 2️⃣nd FASTEST player EVER to reach 3️⃣0️⃣0️⃣0️⃣ ODI runs! #MenInMaroon🌴 #ItsOurGame #INDvWI pic.twitter.com/V1USrjdSpK
— Windies Cricket (@windiescricket) December 22, 2019@ShaidHope becomes the 2️⃣nd FASTEST player EVER to reach 3️⃣0️⃣0️⃣0️⃣ ODI runs! #MenInMaroon🌴 #ItsOurGame #INDvWI pic.twitter.com/V1USrjdSpK
— Windies Cricket (@windiescricket) December 22, 2019
हेही वाचा - पाक फलंदाजांनी केली भारतीय संघाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
शाई होप वन-डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद ३००० धावांचा टप्पा ओलांडणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी पोहचला आहे. ६७ डावांमध्ये शाई होपने ही कामगिरी केली. तर, रिचर्ड्स यांना ही कामगिरी करण्यासाठी ६९ सामने खेळावे लागले होते.
कटकच्या स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात होपने ५० चेंडूत ५ चौकारांसह ४२ धावांची खेळी केली. मोहम्मद शमीने त्याला बाद केले. उभय संघांमध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. दोन्ही संघांनी या मालिकेत १-१ असा विजय मिळवला असल्याने निर्णायक सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.