मुंबई - पाकिस्तान माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने त्याच्या ट्विटर अकाउंटवरुन एक जुना व्हिडिओ शेअर करत ऑस्ट्रेलियाचा दिग्गज अँन्ड्र्यू सायमंडला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याने हा व्हिडिओ शेअर करताना लिहलं की, सर्वात लांब षटकार ठोकणारा कोण होता, हे फक्त मी माझा मित्र सायमंडला दाखवू इच्छित आहे.
आफ्रिदीने पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया एकदिवसीय सामन्याच्या व्हिडिओ शेअर केला आहे. या सामन्यात आफ्रिदीने सायमंडच्या गोलंदाजीवर लांब षटकार ठोकला होता. त्याने हा व्हिडिओ शेअर करत, मी माझा मित्र सायमंडला सर्वात लांब षटकार लगावणारा कोण होता? हे दाखवू इच्छित आहे, असे म्हटले आहे.
-
Just wanted to show my friend Symonds who was the bigger hitter 😉 https://t.co/NkwptihgGL
— Shahid Afridi (@SAfridiOfficial) April 5, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Just wanted to show my friend Symonds who was the bigger hitter 😉 https://t.co/NkwptihgGL
— Shahid Afridi (@SAfridiOfficial) April 5, 2020Just wanted to show my friend Symonds who was the bigger hitter 😉 https://t.co/NkwptihgGL
— Shahid Afridi (@SAfridiOfficial) April 5, 2020
दरम्यान, आफ्रिदी आणि सायमंड दोघेही लांब षटकार लगावण्यासाठी प्रसिद्ध आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त षटकार खेचण्याचा विक्रम वेस्ट इंडीजच्या ख्रिस गेलच्या नावे आहे. त्याने ५३४ षटकार लगावले आहेत. तर या यादीत आफ्रिदी ४७६ षटकारासह दुसऱ्या क्रमाकांवर आहे. तिसऱ्या क्रमाकांवर भारतीय संघाचा रोहित शर्मा असून त्याने ४२३ षटकार खेचले आहेत. सायमंडने १४१ षटकार लगावले आहेत.
आफ्रिदी सद्या कोरोना विरोधातील लढ्यात गरजूंना मदत करत आहे. तो त्याच्या संस्थेच्या माध्यमातून गरजू व्यक्तींना अन्न आणि वैद्यकीय गोष्टींचे मोफत वाटप करत आहे. या कामासाठी आफ्रिदी 'डोनेट करो ना' हे अभियान चालवतो आहे. या अभियानाअंतर्गत आफ्रिदीने पाकिस्तानातील हिंदू आणि ख्रिश्चन वस्त्यांमधील गरजू व्यक्तींनाही अन्नदान केले आहे.
शाहिद या कामाचे कौतूक भारतीय खेळाडू युवराज सिंह आणि हरजभजन सिंग यांनी केले होते. तसेच त्या दोघांनी आफ्रिदीला मदत करा, असे आवाहन केले होते. पण भारतीय नेटीझन्सना युवी आणि भज्जी यांचे आवाहन आवडले नाही. त्यांनी दोघांना ट्रोल केले.
हेही वाचा - Corona Virus : पठाण बंधूंनी गरजूंसाठी दान केले १० हजार किलो तांदूळ, ७०० किलो बटाटे
हेही वाचा - Video : अशी ही मदत ! मी आर्थिक मदत करू शकत नाही, पण दोन एकरातील केळी गरजूंना देतो