ETV Bharat / sports

''अख्तरच्या गोलंदाजीचा सामना करायला घाबरायचा सचिन.. त्याचे पाय थरथर कापायचे''

author img

By

Published : Jul 8, 2020, 2:48 PM IST

Updated : Jul 8, 2020, 2:59 PM IST

शाहिद आफ्रिदीने यावेळी भारताचा दिग्गज माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरविषयी वादग्रस्त विधान केले आहे. तो म्हणाला, ''शोएब अख्तरच्या चेंडूला सामोरे जाण्याची सचिनला भीती वाटत होती, हे सचिन कधीही मान्य करणार नाही. मी घाबरत आहे, असे सचिन आपल्या तोंडून कधीही सांगणार नाही. परंतु अख्तरचे असे काही 'स्पेल्स' होते, ज्यामुळे केवळ सचिनच नाही तर जगातील सर्व महान फलंदाज हादरले होते.''

shahid afridi has claimed that sachin tendulkar has a fear of shoaib akhtar
''अख्तरच्या गोलंदाजीच्या वेळी सचिनचे पाय थरथर कापायचे''

कराची - पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी आपल्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतो. ''पाकिस्तान संघ भारताला इतक्या वेळा हरवायचा, त्यानंतर भारतीय खेळाडू आमच्याकडे येऊन माफी मागायचे'', असे आफ्रिदीने नुकतेच म्हटले होते. आता तो अजून एका वक्तव्यामुळे सोशल मीडियावर ट्रोल झाला आहे.

शाहिद आफ्रिदीने यावेळी भारताचा दिग्गज माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरविषयी वादग्रस्त विधान केले आहे. तो म्हणाला, ''शोएब अख्तरच्या चेंडूला सामोरे जाण्याची सचिनला भीती वाटत होती, हे सचिन कधीही मान्य करणार नाही. मी घाबरत आहे, असे सचिन आपल्या तोंडून कधीही सांगणार नाही. परंतु अख्तरचे असे काही 'स्पेल्स' होते, ज्यामुळे केवळ सचिनच नाही तर जगातील सर्व महान फलंदाज हादरले होते.''

तो पुढे म्हणाला, ''जेव्हा तुम्ही मिड-ऑफ किंवा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षण करत असता, तेव्हा फलंदाजाची बॉडी लँग्वेज तुम्हाला चांगली समजू शकते. फलंदाजावर दबाव असल्याचे आपल्याला दिसून येते. मी असे म्हणत नाही, की शोएबने नेहमीच तेंडुलकरला नेहमीच घाबरवले आहे. मी स्क्वेअर लेगमध्ये फिल्डिंग करत होतो. जेव्हा शोएब गोलंदाजीसाठी येत होता तेव्हा सचिनचा पाय थरथर कापत होता, हे मी पाहिले आहे. युवा फिरकीपटू सईद अजमलविरूद्धही सचिन घाबरला होता. ही मोठी गोष्ट नाही, खेळाडूंना कधीकधी दबाव जाणवतो.''

40 वर्षीय आफ्रिदीने 2016 मध्ये आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे. त्याने 20 वर्षाच्या करिअरमध्ये 27 कसोटी, 398 एकदिवसीय सामने आणि 99 टी-20 सामन्यात प्रतिनिधित्व केले आहे. यात त्याने अनुक्रमे 1716, 8064, 1416 धावा केल्या आहेत. आफ्रिदीने आयपीएलमध्ये 10 सामने खेळले असून त्यात त्याने 81 धावा केल्या आहेत.

Last Updated : Jul 8, 2020, 2:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.