ETV Bharat / sports

कोरोनामुळे ऑस्ट्रेलिया विरूद्ध न्यूझीलंड मालिका रद्द - aus vs nz series latest news

भारत आणि दक्षिण आफ्रिका मालिकेनंतर आता ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिका रद्द झाली आहे. सिडनीतील रिकाम्या स्टेडियमवर पार पडलेल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ७१ धावांनी विजय मिळवला.

Series being played between Australia and New Zealand canceled
कोरोनामुळे ऑस्ट्रेलिया विरूद्ध न्यूझीलंड मालिका रद्द
author img

By

Published : Mar 14, 2020, 3:49 PM IST

सिडनी - कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. या व्हायरसमुळे अनेक क्रीडा स्पर्धा पुढे ढकलल्या गेल्या आहेत. बऱ्याच स्पर्धा प्रेक्षकांशिवाय खेळवल्या जात आहेत. एकंदरीत, कोरोनामुळे हे वर्ष क्रीडाक्षेत्रासाठी कठीण झाले आहे.

हेही वाचा - रिचर्डसननंतर 'या' खेळाडूची केली कोरोना चाचणी...संघातूनही वगळलं

भारत आणि दक्षिण आफ्रिका मालिकेनंतर आता ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिका रद्द झाली आहे. सिडनीतील रिकाम्या स्टेडियमवर पार पडलेल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ७१ धावांनी विजय मिळवला. त्यानंतर न्यूझीलंड संघ आपल्या घरी परतला आहे.

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्यूसनचीही कोरोना चाचणी करण्यात आली आहे. फर्ग्यूसनच्या चाचणीचा अहवाल अजून आला नसला तरी खबरदारी म्हणून त्याला संघापासून वेगळे करण्यात आले आहे.

शुक्रवारी खेळण्यात आलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड सामन्यानंतर त्याला घशात त्रास जाणवू लागला होता. त्यामुळे त्याची चाचणी करण्यात आली. या अगोदरही ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज रिचर्डसनचीही कोरोना चाचणी करण्यात आली होती. मात्र, त्यात कोरोनाची लागण झाली नसल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे रिचर्डसनची संघात पुर्नवापसी झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.