ETV Bharat / sports

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांच्या निवड समितीत सेहवागचा समावेश - Sehwag, sardar in selection panel

ही समिती 2020 साठी राजीव गांधी खेलरत्न, द्रोणाचार्य पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कर आणि मौलाना अबुल कलाम आझाद करंडकसाठी खेळाडूंची निवड करेल.

Sehwag, sardar in selection panel for national sports awards 2020
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांच्या निवड समितीत सेहवागचा समावेश
author img

By

Published : Aug 1, 2020, 5:02 PM IST

नवी दिल्ली - यावर्षी देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांच्या निवड समितीत भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग, भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार सरदारसिंग आणि रियो पॅरालिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकणार्‍या दीपा मलिक यांचा समावेश आहे. क्रीडा मंत्रालयाने शुक्रवारी ही माहिती दिली. या समितीचे अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश मुकुंदकम शर्मा असतील. यामध्ये अर्जुन पुरस्कार प्राप्त माजी टेबल टेनिसपटू मोनालिसा बरुआ आणि माजी बॉक्सिंगपटू वेंकटेश देवराजन यांचा समावेश आहे.

ही समिती 2020 साठी राजीव गांधी खेलरत्न, द्रोणाचार्य पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कर आणि मौलाना अबुल कलाम आझाद करंडकसाठी खेळाडूंची निवड करेल.

समितीमध्ये एसएआयचे महासंचालक संदीप प्रधान, क्रीडा मंत्रालयाचे सहसचिव (क्रीडा विकास) एलएस सिंग आणि टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीमचे (टीओपीएस) मुख्य कार्यकारी अधिकारी कमांडर राजेश राजगोपालन यांचा समावेश आहे. या समितीत क्रीडा भाष्यकार मनीष वाटाविया यांच्याशिवाय आलोक सिन्हा आणि नीरू भाटिया या दोन पत्रकारांचा समावेश आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.