नवी दिल्ली - क्रिकेट बूकी संजीव चावलाचे प्रत्यार्पण भारताकडे करण्यात आले असून त्याला लंडनवरून दिल्लीला आणण्यात आले आहे. आज दिल्लीच्या न्यायालयात त्याला हजर करण्यात आले. तेव्हा पोलिसांनी चावलाला १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी मागितली आहे. चावलावर मॅच फिक्सिंग रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे.
२००० साली मॅच फिक्सिंगचा प्रकार घडला होता. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामने फिक्स असल्याचा संशय दिल्ली पोलिसांना होता. तेव्हा या प्रकरणाची चौकशी अजय राज शर्मा यांच्या निरीक्षणाखाली झाली होती. यानंतर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार हॅन्सी क्रोनिए आणि भारताचा कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांच्यावर आजीवन बंदी घालण्यात आली होती.
इंग्लंडसोबत १९९२ मध्ये झालेल्या प्रत्यार्पण करारानुसार भारतात आणला जाणारा संजीव हा दुसरा व्यक्ती ठरला. दरम्यान, दिल्ली पोलीस आयुक्त अजय राज शर्मा यांनी म्हटले की, 'चावलाला १९ वर्षांनी भारतात आणले जाणार आहे. त्याच्या चौकशीत क्रिकेट जगतातील अनेक मोठी नावे समोर येण्याची शक्यता आहे.'
हेही वाचा -
टीम इंडियाची न्यूझीलंड भ्रमंती, 'या' खेळाडूने शेअर केले अनुष्कासोबतचे फोटो
हेही वाचा -
SA vs ENG : लुंगी एनगिडीची कमाल, आफ्रिकेने रोमांचक सामन्यात इंग्लंडचा १ धावेनं केला पराभव