ETV Bharat / sports

प्रशिक्षक पदावरुन हटवल्याने संजय बांगर यांची 'सटकली'... निवड समितीकर्त्यासोबत गैरवर्तन

पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, संजय बांगर हे मागील ५ वर्षांपासून भारतीय संघाचे फलंदाजीचे प्रशिक्षक होते. आता राष्ट्रीय निवड समितीने संजय बांगर यांच्या ठिकाणी विक्रम राठोड यांची नियुक्ती केली. यामुळे संतप्त बांगर यांनी राष्ट्रीय निवडकर्ता दिबांग गांधी यांच्यावर राग व्यक्त केला. वेस्ट इंडीज दौर्‍याच्या वेळी हॉटेलच्या खोलीत बांगर यांनी गांधींशी गैरवर्तन करत अर्वाच्च भाषेत खडेबोल सुनावले, असे सांगितले जात आहे.

प्रशिक्षक पदावरुन हटवल्याने संजय बांगर यांची 'सटकली'...केले निवड समितीकर्त्यासोबत गैरवर्तन
author img

By

Published : Sep 4, 2019, 8:12 PM IST

जमैका - भारतीय क्रिकेट संघाचे माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर वादात सापडले असून, त्यांनी वेस्ट इंडीज दौऱ्यामध्ये राष्ट्रीय निवड समितीच्या अधिकाऱ्याशी गैरवर्तन केल्याचे, सांगण्यात येत आहे. दरम्यान, वेस्ट इंडीज दौऱ्यानंतर बांगर यांच्या ठिकाणी विक्रम राठोड यांची संघाचे फलंदाज प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, संजय बांगर हे मागील ५ वर्षांपासून भारतीय संघाचे फलंदाजीचे प्रशिक्षक होते. आता राष्ट्रीय निवड समितीने संजय बांगर यांच्या ठिकाणी विक्रम राठोड यांची नियुक्ती केली. यामुळे संतप्त बांगर यांनी राष्ट्रीय निवडकर्ता दिबांग गांधी यांच्यावर राग व्यक्त केला. वेस्ट इंडीज दौर्‍याच्या वेळी हॉटेलच्या खोलीत बांगर यांनी गांधींशी गैरवर्तन करत अर्वाच्च भाषेत खडेबोल सुनावले, असे सांगितले जात आहे.

पीटीआयशी बोलताना बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, संजय बांगर यांनी असभ्य वर्तन केले आहे का? याची खातरजमा करावी लागेल. त्यानंतर आपण नियमांच्या आधारे त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. मात्र, या प्रकरणात गांधी यांनी तक्रार केल्यानंतरच याचा तपास करता येईल.

महत्त्वाचे म्हणजे, निवड सामितीने कोचिंग स्टाफपैकी केवळ बांगर यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. तर गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांना त्यांच्या पदावर कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

Intro:Body:

news 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.