मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह लवकरच क्रीडा अँकर संजना गणेशन हिच्याशी लग्न करणार आहे. माध्यमाच्या वृत्तानुसार, हा लग्नसोहळा १४ आणि १५ मार्चला होणार आहे. प्रेमात वय, जात, रंग या सारख्या गोष्टींना थारा नसल्याचं म्हटलं जात. बुमराह आणि संजना यांच्या बाबतीत देखील असचं घडलं.
बुमराहची होणारी पत्नी संजना, ही बुमराहपेक्षा वयाने मोठी आहे. संजनाचा जन्म ६ मे १९९१ ला पुणे येथे झाला. तर बुमराहचा जन्म हा ६ डिसेंबर १९९३ ला झाला. यावरुन संजना ही बुमराहपेक्षा अडीच वर्षांनी मोठी आहे.
कोण आहे संजना गणेशन -
संजना गणेशनने इंजिनिअरींगचे शिक्षण घेतलं आहे. यासोबत तिने मॉडेलिंगमध्ये देखील आपले नशिब आजमवलं आहे. तसेच तिनं रिअॅलटी शोमध्ये देखील आपला सहभाग नोंदवला आहे. सद्या ती क्रीडा अँकरीगचे काम करते.
हेही वाचा - WI vs SL, २nd ODI : वेस्ट इंडिजचा श्रीलंकेवर ५ गडी राखून विजय, मालिकेत विजयी आघाडी
हेही वाचा - IPL २०२१ : पंजाब किंग्जची जय्यत तयारी, 'या' ऑस्ट्रेलियन खेळाडूला केलं प्रशिक्षक