लंडन - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा ८९ धावांनी पराभव केला. दारुण झालेल्या पराभवनांतर चाहत्यांनी संघातील खेळाडूंवर टीकेचा भडिमार केला आहे. चाहत्यांनी टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाक क्रिकेटपटू शोएब मलिक यांनाही सोशल मीडियावर ट्रोल केले. या टीकेला सानियानेही सडेतोड उत्तर दिले आहे.
भारत-पाक सामन्यापुर्वी शनिवारच्या रात्री इंग्लडमध्ये डिनरसाठी सानिया आणि तिचा पती शोएब मुलासह एका रेस्ट्रारंटमध्ये गेली होती. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याच्या दुसऱ्या दिवशी भारताशी सामना रंगणार होता. यावर पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिकने ट्विट करत सानियाला खडेबोल सुनावले. तिने सानियाला तुम्ही ज्या क्लबमध्ये डिनरसाठी गेला होतात तिथं जंक फुड असते. ते खेळाडूंसाठी योग्य आहे का? असे सांगत टीका केली होती. तसेत तिने तु स्वतः एक आई आणि खेळाडू आहेस तुला हे माहित पाहिजे, असं सांगत समाचार घेतला होता.
यावर सानिया मिर्झाने पलटवार केला आहे. तिने मी माझ्या मुलाला कुठे घेऊन जायचे हा निर्णय माझा असल्याचं वीणाला सांगितलं. तसेच सानियाने मी पाकिस्तान क्रिकेट संघाची आई किंवा शिक्षिका नसल्याचही प्रत्युत्तर दिलं आहे. सानियाने केलेल्या या ट्विटला १८०० हून अधिक लोकांनी रिट्विट केला आहे.