कराची - पाकिस्तान महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार सना मीरला कोरानाची लागण झाली आहे. कोरोनाचा संसर्ग होताच सनाला समालोचनाच्या गटातून वगळण्यात आले आहे. सध्या ती क्वारंटाइन असून इतर समालोचकांचीही कोरोना चाचणी करण्यात आली आहे.
हेही वाचा - श्रीलंकेत पोहोचला इंग्लंडचा संघ... मोईन अलीला झाली कोरोनाची लागण
पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या कायदे आझम ट्रॉफी स्पर्धेत सना समालोचन करत होती. यावेळी ती पॉझिटिव्ह आढळली. सनाने पाकिस्तानकडून १२० एकदिवसीय आणि १०६ टी -२० सामने खेळले आहेत. या सामन्यात तिने अनुक्रमे १६३० आणि ८०२ धावा केल्या आहेत. तिने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १५१ आणि टी-२० मध्ये ८९ विकेट्स घेतल्या आहेत.
सनाने पाकिस्तानकडून २००९ ते २०१७ या कालावधीत १३७ सामन्यांचे नेतृत्व केले आहे. तिने डिसेंबर २००५ मध्ये श्रीलंकेविरुद्ध कराची येथे एकदिवसीय आणि मे २००९ मध्ये आयर्लंडविरुद्ध टी -२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.