ETV Bharat / sports

सॅल्युट विरू तुझ्या कामाला..! पुलवामा हल्ल्यातील हुतात्मा जवानांच्या मुलांना शिकवतोय क्रिकेट

हुतात्मा राम वकिल यांचा मुलगा अर्पित सिंह आणि हुतात्मा विजय सोरेंग यांचा मुलगा राहुल सोरेंग हे सेहवागच्या शाळेत शिकत आहेत. या मुलांच्या शिक्षणाचा खर्च विरेंद्र सेहवागने उचलला आहे.

author img

By

Published : Oct 17, 2019, 1:28 PM IST

नवी दिल्ली - भारताचा माजी स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवाग पुलवामा हल्ल्यातील हुतात्मा झालेल्या जवानांच्या मुलांना आपल्या शाळेत क्रिकेटचे धडे देतो आहे. सेहवागने याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यानंतर चाहत्यांनी सेहवागची तोंडभरून स्तुती केली आहे.

१४ फेब्रुवारी २०१९ ला पाकिस्तानी अतिरेक्यांकडून केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांवर हल्ला करण्यात आला. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा भागात झालेल्या या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफच्या ४० हून अधिक जवानांना आपले प्राण गमवावे लागले. यानंतर अनेक लोक हुतात्मा झालेल्या जवानांच्या कुटुंबीयाच्या मदतीला सरसावले होते. यात विरेंद्र सेहवागही होता.

त्याने आपल्या ट्विटर अकांउटवर प्रशिक्षण देतानाचे फोटो शेअर केले आहेत. त्यासोबत त्याने हिरो के बेटे..! पूलवामा हल्ल्यातील हुतात्मा जवानांच्या मुलांच्या आयुष्यात योगदान देण्याचा बहुमान मिळाल्याबद्दल मला आनंद आहे, असा आशयाचा मजकूरही पोस्ट केला आहे.

  • Son of Heroes !
    What a privilege to be able to have these two at @SehwagSchool and have the fortune to contribute to their lives.
    Batsman - Arpit Singh s/o Pulwama Shaheed Ram Vakeel &
    Bowler- Rahul Soreng s/o Pulwama Shaheed Vijay Soreng.
    Few things can beat this happiness ! pic.twitter.com/Z7Yl4thaHd

    — Virender Sehwag (@virendersehwag) October 16, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हुतात्मा राम वकिल यांचा मुलगा अर्पित सिंह आणि हुतात्मा विजय सोरेंग यांचा मुलगा राहुल सोरेंग हे सेहवागच्या शाळेत शिकत आहेत. या मुलांच्या शिक्षणाचा खर्च विरेंद्र सेहवागने उचलला आहे.

दरम्यान, यापूर्वी काही दिवसांपूर्वी भारताचा दुसरा सलामीवीर सेहवागचा साथीदार गौतम गंभीरनेही आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने, दहशतवादी हल्ल्यातील हुतात्मा जवानांच्या १०० मुलांची जबाबदारी स्वीकारली आहे.

हेही वाचा - धोनीच्या निवृत्तीबद्दल सौरव गांगुली म्हणाला...

हेही वाचा - सुपर ओव्हरच्या 'नवीन' नियमावर सचिन म्हणाला....

Intro:Body:

marathi sports

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.