नवी दिल्ली - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वी मालदीवला भेट दिली होती. त्यावेळी मोदींनी मालदीवचे राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सालेह यांना एक खास बॅट दिली आहे. या बॅटवर २०१९ च्या विश्वकरंडक स्पर्धेत खेळणाऱ्या भारतीय संघातील सर्व खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या होत्या. मोदींनी सालेह यांना बॅट देतानाचा फोटो आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केले होते.
या फोटोवर आपली प्रतिक्रिया देताना सचिनने ट्विटरवर एक पोस्ट शेयर केली आहे. त्यात त्याने लिहीले आहे की, मालदीवमध्ये क्रिकेटचा प्रचार केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार. लवकरच क्रिकेटच्या नकाशावर मालदीव पाहायला मिळण्याची आशा आहे.
मालदीवचे राष्ट्रपती सालेह हे आयपीएलच्या एका सामन्याला हजर राहिले होते. तेव्हा त्यांनी मालदीवमध्ये एक क्रिकेटचा संघ असावा, अशी इच्छा व्यक्त केली होती.