ETV Bharat / sports

धवन तुझे दु:ख मी समजू शकतो..., असे सांगत सचिनने पंतलाही दिल्या शुभेच्छा..!

महान फलंदाज सचिन तेंडुलकरने भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर शिखर धवन आयसीसी विश्वकरंडक २०१९ मधून बाहेर पडल्याने दुख व्यक्त केले आहे. तर धवनच्या जागी संघात निवडण्यात आलेल्या युवा खेळाडू ऋषभ पंतला चांगल्या कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

सचिन तेंडुलकर
author img

By

Published : Jun 20, 2019, 8:37 PM IST

मुंबई - महान फलंदाज सचिन तेंडुलकरने भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर शिखर धवन आयसीसी विश्वकरंडक २०१९ मधून बाहेर पडल्याने दुख व्यक्त केले आहे. तर धवनच्या जागी संघात निवडण्यात आलेल्या युवा खेळाडू ऋषभ पंतला चांगल्या कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. धवनला झालेल्या अंगठ्याला दुखापतीमुळे तो पूर्ण विश्वकंरडक स्पर्धेला मुकणार आहे.

सचिनने ट्वीटरवर धवन आणि पंतसाठी एक ट्वीट केले आहे. त्यात तो म्हणाला की, धवन मला तुझ्यासाठी वाईट वाटत आहे. तू खूप चांगला खेळत होतास आणि एवढ्या महत्वाच्या स्पर्घेतून दुखापतीमुळे माघार घेणे हे खूप निराशाजनक असते. मला माहीत आहे की तू दमदार पुनरागमन पुनरागमण करशील. तसेच पंतला शुभेच्छा देताना सचिन म्हणाला की, तू चांगला खेळत असून तुला आपली प्रतिभा दाखवण्यासाठी ही चांगली संधी आहे.

भारताचा पुढील सामना अफगानिस्तानविरुद्ध शनिवारी खेळला जाणार आहे.

Intro:Body:

news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.