मुंबई - भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली या दोन माजी फलंदाजांना खूप महत्त्व आहे. या दोघांनी भारतीय संघाला अनेक विजय मिळवून दिले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिन आणि गांगुलीने 176 वेळा भागीदारी रचत 8227 धावा केल्या आहेत. दरम्यान, आयसीसीने या दोघांचा एक एकत्रित फोटो ट्विट केला. या ट्विटवर सचिन-गांगुलीने जबरदस्त उत्तर दिले आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आपल्या ट्विटरवर या दोघांची आकडेवारी पोस्ट केली आणि लिहिले, "एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली म्हणजे 176 वेळा दमदार भागीदारी, 8227 धावा आणि सरासरी 47.55… इतर कोणत्याही जोडीने एकदिवसीय सामन्यात 6000 चा टप्पा ओलांडला नाही."
-
Sachin Tendulkar ➕ Sourav Ganguly in ODIs:
— ICC (@ICC) May 12, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
👉 Partnerships: 176
👉 Runs: 8,227
👉 Average: 47.55
No other pair has crossed even 6,000 runs together in ODIs 🤯 pic.twitter.com/VeWojT9wsr
">Sachin Tendulkar ➕ Sourav Ganguly in ODIs:
— ICC (@ICC) May 12, 2020
👉 Partnerships: 176
👉 Runs: 8,227
👉 Average: 47.55
No other pair has crossed even 6,000 runs together in ODIs 🤯 pic.twitter.com/VeWojT9wsrSachin Tendulkar ➕ Sourav Ganguly in ODIs:
— ICC (@ICC) May 12, 2020
👉 Partnerships: 176
👉 Runs: 8,227
👉 Average: 47.55
No other pair has crossed even 6,000 runs together in ODIs 🤯 pic.twitter.com/VeWojT9wsr
या ट्विटला सचिन-गांगुलीने गमतीशीर उत्तर दिले आहे. सचिन म्हणाला, ''ही आठवण खूपच मस्त आहे, दादा (गांगुली). पण तुला काय वाटते (ICC च्या नव्या नियमानुसार) 30 यार्डच्या वर्तुळाबाहेर 4 खेळाडू आणि 2 नवे चेंडू असते तर आपण अजून किती धावा काढू शकलो असतो?''
सचिनच्या ट्विटवर गाांगुली म्हणाला, ''अजून चार हजार धावा आपण नक्की केल्या असत्या. सामन्यात दोन नवे चेंडू … ऐकायला खूप मस्त वाटतंय.. कव्हरच्या दिशेने मारलेला चेंडू संपूर्ण सामनाभर सीमारेषेपार जाताना दिसतोय.''
-
Another 4000 or so ..2 new balls..wow .. sounds like a cover drive flying to the boundary in the first over of the game.. for the remaining 50 overs 💪😊..@ICC @sachin_rt https://t.co/rJOaQpg3at
— Sourav Ganguly (@SGanguly99) May 12, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Another 4000 or so ..2 new balls..wow .. sounds like a cover drive flying to the boundary in the first over of the game.. for the remaining 50 overs 💪😊..@ICC @sachin_rt https://t.co/rJOaQpg3at
— Sourav Ganguly (@SGanguly99) May 12, 2020Another 4000 or so ..2 new balls..wow .. sounds like a cover drive flying to the boundary in the first over of the game.. for the remaining 50 overs 💪😊..@ICC @sachin_rt https://t.co/rJOaQpg3at
— Sourav Ganguly (@SGanguly99) May 12, 2020