मेलबर्न - ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मायकल हसी याने त्याचा सर्वोत्कृष्ट विरोधी कसोटी संघ निवडला आहे. त्याने त्याच्या संघात भारताच्या तीन खेळाडूंना स्थान दिले असले, तरी महेंद्रसिंह धोनीला त्याने बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
मायकल हसीने विरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांना त्याच्या संघात घेतलं आहे. सलामीवीर म्हणून त्याने सेहवाग आणि दक्षिण आफ्रिकेच्या ग्रीम स्मिथला पसंती दिली आहे. त्यानंतर त्याने अनुक्रमे वेस्ट इंडीजचा महान खेळाडू ब्रायन लारा, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलिस, श्रीलंकेचा कुमार संगकारा यांना ठेवलं आहे.
हसीच्या गोलंदाजीची कमान दक्षिण आफ्रिकेचा डेल स्टेन, मोर्ने मॉर्केल, इंग्लंडचा जेम्स अँडरसन आणि श्रीलंकेचा फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनवर आहे. महत्वाचे म्हणजे हसी याने या संघाची निवड करताना तो ज्या खेळाडूंविरोधात खेळला आहे. त्यातील खेळाडूंची निवड त्याने केली आहे.
मायकल हसीने निवडलेला सर्वोत्कृष्ट विरोधी संघ -
- विरेंद्र सेहवाग, ग्रीम स्मिथ, ब्रायन लारा, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, जॅक कॅलिस, कुमार संगकारा, डेल स्टेन, मोर्नी मॉर्केल, जेम्स अँडरसन, मुथय्या मुरलीधरन.
हेही वाचा - Happy Birthday Rohit Sharma : एकेकाळी शाळेची फी भरण्यासाठी नव्हते पैसे, आज आहे टीम इंडियाचा 'हिटमॅन'
हेही वाचा - HBD Rohit : रोहितने गुडघ्यावर बसून रिंग देत रितिकाला केलं प्रपोज, वाचा हिटमॅनची बॉलिवूड स्टाईल लवस्टोरी