मुंबई - अभिषेक बच्चन पुन्हा एकदा एक आव्हानात्मक भूमिकेत आपल्या अभिनयाचा दर्जा दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याची भूमिका असलेल्या 'आय वॉन्ट टू टॉक' या चित्रपटाचा ट्रेलर आज 5 नोव्हेंबर रोजी रिलीज झाला आहे. अभिषेक बच्चन सध्या कौटुंबिक वादामुळे चर्चेत असतानाच त्याच्या 'आय वॉन्ट टू टॉक' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज लॉन्च झाला आहे. या चित्रपटातील अभिषेकचा फर्स्ट लूक समोर आला आहे. 'आय वॉन्ट टू टॉक'चे दिग्दर्शक शूजित सरकार आहेत. हा चित्रपट चालू महिन्यातच रिलीज होणार आहे. चला जाणून घेऊया, कसा आहे 'आय वॉन्ट टू टॉक' चित्रपटाचा ट्रेलर आणि अभिषेक बच्चनच्या अभिनयाबद्दल.
'आय वॉन्ट टू टॉक'चा ट्रेलर - 'आय वॉन्ट टू टॉक'च्या ट्रेलरमध्ये अभिषेक बच्चन एका आजारी वडीलाची भूमिका साकारत आहे. हा ट्रेलर आजारी बाप आणि त्याची मनस्वी मुलगी यांच्या भोवती फिरतो. या चित्रपटात अभिषेक अर्जुन नावाची व्यक्तिरेखा साकारत आहे. अभिषेक मणक्याच्या आजाराने त्रस्त असून त्याच्याकडे फार कमी वेळ आहे. त्याच वेळी, तो त्याच्या आजारपणात आपल्या मुलीची काळजी करत आहे. यामध्ये त्याची पत्नी कुठंच दिसत नसल्यामुळे तो सिंगल फादरच्या भूमिकेत आहे हे स्पष्ट होतं.
'आय वॉन्ट टू टॉक'मधील अभिषेक बच्चनचा फर्स्ट लूक - अलीकडेच 'आय वॉन्ट टू टॉक'च्या फर्स्ट लूकमध्ये अभिषेक बच्चन यलो प्रिंट शॉर्ट आणि गाऊनमध्ये दिसला आहे. यामध्ये त्याचे पोट दिसत असून त्यावर टाके घातलेली रेषाही दिसत आहे. त्याच्या डाव्या हाताला हॉट बँडही आहे. अभिषेकने डोळ्यावर गडद चष्मा लावला आहे.
'आय वॉन्ट टू टॉक' छिएटरमध्ये रिलीजसाठी सज्ज - 'आय वॉन्ट टू टॉक'ची पटकथा आणि संवाद रितेश शाहने लिहिले आहेत. रॉनी लाहिरी आणि शील कुमार या चित्रपटाचे निर्माते आहेत. पर्ल डे, अहिल्या बांबरू, अभिषेक बच्चन, जयंत कृपलानी, क्रिस्टीन गोडार्ड आणि जॉनी लीव्हर या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 'आय वॉन्ट टू टॉक' 22 नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.