ETV Bharat / state

'त्यांच्या लाडक्या ताईंची बदली केली'; संजय राऊतांची देवेंद्र फडणवीसांवर खोचक टीका, कोल्हापूर प्रकरणी काँग्रेसला घेतलं फैलावर

खासदार संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर रश्मी शुक्लांच्या बदलीवरुन तोफ डागली आहे. त्यांच्या लाडक्या ताईला निवडणूक आयोगानं हटवलं, अशी खोचक टीका संजय राऊतांनी केली.

Sanjay Raut On Devendra Fadnavis
संपादित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 5, 2024, 10:54 AM IST

Updated : Nov 5, 2024, 11:08 AM IST

मुंबई : विधानसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी जोरदार सुरू आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. उबाठा खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केला आहे. सरकारी गाड्यातून पैशांचं वाटप सुरू आहे, असा जोरदार हल्लाबोल खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांमुळे मोठा वाद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोल्हापूरची जागा आम्ही अगोदर मागितली होती. मात्र काँग्रेस या जागेसाठी अडून बसल्यानं आम्ही ही जागा काँग्रेसला सोडली. आमचा उमेदवारही बंडखोरी करू शकला असता, मात्र आम्ही अन्याय झाला तरी सहन करतो, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

Sanjay Raut On Devendra Fadnavis
खासदार संजय राऊत (Reporter)

रश्मी शुक्लांना बढती देऊन बेकायदेशीर कामं : याप्रसंगी बोलताना संजय राऊत म्हणाले की, "ज्या अधिकाऱ्यांनी विरोधकांचे फोन टॅप केले. बेकायदेशीरपणे ते ऐकले. जो अधिकारी निलंबित असून तुरुंगात जाण्याच्या तयारीत होता. अशा व्यक्तीला सरकार बदलल्यानंतर पोलीस महासंचालक पदी भरती देण्यात आली. त्यांच्याकडून अनेक बेकायदेशीर कामे करून घेतली गेली. म्हणून अखेर देवेंद्र फडणवीस यांच्या लाडक्या ताई रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरून हटवण्यात आलं. हे पद अतिशय प्रतिष्ठेचं आहे. या पदावर कोणाला बसवावं याचं भान गृहमंत्र्यांना नसेल तर त्यांना प्रशासन, नैतिकता कळत नाही. आम्ही निवडणूक आयोगाचे आभारी आहोत. त्यांनी आता भाजपाचा अजेंडा राबवू नये, याची काळजी घ्यावी," असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

सर्वात मोठा बखेडा ईव्हीएमचा : निवडणुका पारदर्शकपणे होतील का यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, "सर्वात मोठा बखेडा हा ईव्हीएमचा आहे. आज अमेरिकेच्या महासत्तेची निवडणूक होत आहे. तेथील जनता बॅलेट पेपरवर मतदान करत आहे. जो देश ज्ञानात, विज्ञानात, संशोधनात सर्वात पुढं आहे. ते सुद्धा त्यांच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक बॅलेट पेपरवर घेतात. हे राज्याच्या आमच्या निवडणूक आयोगाला समजत नसेल, तर त्यांच्या कार्यपद्धतीवर कायम प्रश्नचिन्ह राहील. तसेच ज्यांनी बंडखोरी केली आहे, त्यांच्यावर कारवाई करायला आमच्याकडून सुरुवात झाली आहे," असंही संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं.

राज ठाकरेंच्या प्रमाणपत्राची गरज नाही : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना नाव आणि चिन्ह ही बाळासाहेबांची प्रॉपर्टी असल्याचं काल डोंबिवलीतील सभेत सांगितलं. संजय राऊत यांनी त्याचाही समाचार घेतला आहे. ते म्हणाले की, "राज ठाकरे जे म्हणत आहेत, तेच आम्ही पूर्वीपासून सांगत आहोत. शिवसेना पक्ष, धनुष्यबाण बाळासाहेबांचीच प्रॉपर्टी आहे. हे एकनाथ शिंदे यांच्या घशात घालणारे मोदी, शाह कोण? गुजरातच्या दोन व्यापाऱ्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही आहेर म्हणून एकनाथ शिंदे यांना दिली. राज ठाकरे यांनी यावर बोलायला पाहिजे. यासाठी राज ठाकरे यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही. आज राज ठाकरे ज्यांची तळी उचलत आहेत. त्या राज ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे हे माफ करणार नाहीत. राज ठाकरे यांना महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री करायचा आहे. तसेच दादर, माहीम, प्रभादेवी या मतदार संघात उबाठाचे उमेदवार महेश सावंत हे 15 ते 20 हजार मतांनी विजयी होणार आहेत.

काँग्रेसनं जागा सोडली नाही, म्हणून झाला गोंधळ : कोल्हापूर उत्तर ही जागा शिवसेनेने 7 वेळा जिंकली आहे. 2019 मध्ये आम्ही ती जागा अपघातानं हरलो. परंतु काँग्रेसनं ती जागा आम्हाला सोडली नाही. आज त्या जागेवर गोंधळ निर्माण झाला आहे, अशी टीकाही त्यांनी काँग्रेसवर केली आहे.

हेही वाचा :

  1. बंडखोर अर्ज मागे घेणार नाहीत; त्यांच्यावर पक्ष कारवाई करेल, उद्धव ठाकरेंचा इशारा
  2. अरविंद सावंत चुकीचं काय बोलले? संजय राऊतांकडून पाठराखण
  3. आमचे फोन आजही टॅपिंग केले जातात, संजय राऊतांचा गंभीर आरोप

Last Updated : Nov 5, 2024, 11:08 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.