पेरु Player Died in Live Match : खेळाच्या मैदानावर अनेक खेळाडूंना अनेकदा जीव गमवावा लागला आहे. दुखापतीमुळं अनेकदा खेळाडूंचा मृत्यू झाल्याचं आपण ऐकलं आहे. मात्र पेरुमध्ये फुटबॉल सामन्यादरम्यान नैसर्गिक आपत्तीमुळं एका खेळाडूचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती.
नेमकं काय घडलं : पेरुमध्ये उव्हेंटुड बेलाविस्ता आणि फॅमिलिया कोका यांच्यात फुटबॉलचा सामना सुरु होता आणि त्यादरम्यान जोरदार पाऊस सुरु झाला. पावसातही फुटबॉलचा खेळ सुरु असतो आणि या मैदानावरही तेच घडत होतं. पण सामन्यादरम्यान आकाशातून वीज पडली आणि अनेक खेळाडूंना त्याचा फटका बसला. या अपघातात एका खेळाडूला जीव गमवावा लागला.
CRAZY: Lightning killed a football player during a match in Peru and injured five others, they are in hospital with serious burns
— First Source Report (@FirstSourceNew) November 4, 2024
What a crazy and a random thing. Insane. pic.twitter.com/aRZsRCaEJo
पेरुमध्ये लाइव्ह मॅचमध्ये भीषण अपघात : पेरुमध्ये सुरु असलेल्या या सामन्यादरम्यान मुसळधार पाऊस सुरु झाला, त्यानंतर पंचांनी खेळाडूंना खेळ थांबवून मैदानाबाहेर येण्यास सांगितलं. खेळाडू मैदान सोडत होते पण अचानक आकाशातून वीज पडली आणि 39 वर्षीय खेळाडू जोस ह्यूगो डे आणि ला क्रूझ मेसा यांना त्याचा फटका बसला. मेसाच्या डोक्यात वीज पडल्यानं मैदानावरच त्याचा मृत्यू झाला. तसंच मेसाच्या सहकारी खेळाडूंनाही विजेचा धक्का बसला आणि ते गंभीररित्या जखमी झाले. या खेळाडूंना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
एका खेळाडूचा जीव धोक्यात : या अपघातात मेसाला आपला जीव गमवावा लागला आहे. पण आता आणखी एका खेळाडूच्या जीवाला धोका आहे. वृत्तानुसार, या अपघातात गोलकीपर जुआन चोका देखील गंभीररित्या जखमी झाला असून त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर अपघातानंतर हा सामना रद्द करण्यात आला.
भारतातही घडलेली आहे अशी दुर्घटना : पेरुपूर्वी भारतातही अशी दुर्घटना घडली होती. यावर्षी झारखंडमधील सिमडेगा इथं तीन हॉकीपटूंचा वीज पडून मृत्यू झाला होता. या अपघातात आणखी पाच खेळाडू जखमी झाले होते. हे सर्व खेळाडू पावसापासून बचाव करण्यासाठी झाडाखाली उभे होते.
हेही वाचा :