लंडन - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेचा अंतिम सामना रोमहर्षंक पध्दतीने अनिर्णयीत राहिला. तेव्हा सामन्याच्या निकालासाठी सुपर ओव्हर खेळवण्यात आली. मात्र, या सुपर ओव्हरमध्ये देखील सामना बरोबरीत सुटला. त्यानंतर सुपर ओव्हरच्या चौकार-षटकारांच्या निकषानुसार इंग्लंडच्या संघाला विजयी घोषित करण्यात आले.
प्रथमच इंग्लंडने विश्वकरंडक जिंकला तरी, चर्चा मात्र न्यूझीलंडचे खेळाडू आणि कर्णधार केन विल्यमसनचीच झाली. या सामन्यात इंग्लंडच्या बेन स्टोक्सने चांगली कामगिरी केली. परंतु, केन विल्यमसनने सामन्याचा निकाल आपल्या बाजूने लागला नसूनही चेहऱ्यावर हास्य कायम ठेवले. हसत हसत पराभव स्वीकारणाऱ्या या कर्णधाराच्या नावाने भारतात ट्विटरवर ट्रेण्ड सुरू झाला.
केन विल्यमसनचा खिलाडूवृत्तीचे कौतूक सर्वत्र जगभरात झाले. त्यानंतर आता क्रिकेटचा महान खेळाडू सचिनही केनचा चाहता झाला. त्याने आपल्या अकाऊंटवर ट्विट करत केन लढवय्या कर्णधार आहे. मी केनचा चाहता असल्याचे सांगितले.
दरम्यान, सचिन तेंडूलकरने आपली ड्रीम विश्व11 निवडली आहे. या संघाचे नेतृत्व त्याने केन विल्यमसनला दिले आहे.