केप टाउन - सलामीवीर क्विंटन डी कॉकच्या शतकी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडवर ७ गडी राखून विजय मिळवला. डी कॉकला टेम्बा बावूमा याने ९८ धावा काढत चांगली साथ दिली.
आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तेव्हा इंग्लंडने जो डेनली ८७ आणि ख्रिस वोक्सच्या ४० धावांच्या जोरावर ५० षटकात ८ बाद २५८ धावा केल्या. इंग्लंडने दिलेले २५९ धावांचे लक्ष्य आफ्रिकेने ४७.४ षटकात ३ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले.
क्विंटन डी कॉकने ११३ चेंडूत ११ चौकार आणि १ षटकारासह १०७ धावांची खेळी साकारली. त्याला टेम्बा बावूमा याने ९८ धावा करत चांगली साथ दिली. वॉन डर दुशानने नाबाद ३८ धावा करत संघाला विजय मिळवून दिला. डी कॉक सामनावीर ठरला.
दरम्यान, उभय संघात तीन सामन्याची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. दुसरा सामना ७ फेब्रुवारीला डरबन येथे खेळला जाणार आहे.
हेही वाचा - सचिन म्हणतो, मी पुन्हा येईन..! शेअर केला ताडोबा भेटीचा व्हिडिओ
हेही वाचा - पाकविरुद्धच्या सामन्यादरम्यान भारतीय संघाच्या 'या' खिलाडूवृत्तीचे चाहत्याकडून कौतुक