पुणे - चेन्नई सुपर किंग्जचा युवा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाड आगामी विजय हजारे करंडक स्पर्धेत महाराष्ट्र संघाचा कर्णधार असणार आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने शनिवारी २० सदस्यीय संघाची घोषणा केली.
गेल्या वर्षी इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत असताना २४ वर्षीय ऋतुराजने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याच्याशिवाय फलंदाजांध्ये अनुभवी केदार जाधव, राहुल त्रिपाठी, अंकित बावणे, नौशाद शेख यांचा समावेश आहे. तर, निखिल नायक आणि विशांत मोरे या दोन यष्टिरक्षकांना संघात कायम ठेवण्यात आले आहे.
-
Ruturaj Gaikwad appointed as a captain of Team Maharashtra for Vijay Hazare Trophy #VijayHazareTrophy @BCCIdomestic #INDvENG https://t.co/Cz3bewYZJM
— Maharashtra Cricket (@MaharashtraCric) February 13, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Ruturaj Gaikwad appointed as a captain of Team Maharashtra for Vijay Hazare Trophy #VijayHazareTrophy @BCCIdomestic #INDvENG https://t.co/Cz3bewYZJM
— Maharashtra Cricket (@MaharashtraCric) February 13, 2021Ruturaj Gaikwad appointed as a captain of Team Maharashtra for Vijay Hazare Trophy #VijayHazareTrophy @BCCIdomestic #INDvENG https://t.co/Cz3bewYZJM
— Maharashtra Cricket (@MaharashtraCric) February 13, 2021
हेही वाचा - विराट 'या' कारणामुळे मोईन अलीला आयुष्यभर लक्षात ठेवेल!
गोलंदाजी विभागात फिरकीपटू सत्यजित बच्चन, जगदीश जोपे, वेगवान गोलंदाज अक्षय पालकर, मनोज इंगळे, प्रदीप दाधे आणि डावखुरा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरी यांचा समावेश आहे. दिल्ली, मुंबई, हिमाचल प्रदेश, राजस्थान आणि पांडिचेरी यांच्यासह महाराष्ट्राला स्पर्धेच्या ड गटात स्थान देण्यात आले आहे. हे संघ जयपूरमध्ये त्यांचे सर्व सामने खेळणार आहेत.