नवी दिल्ली - व्हॅलेंटाईन डेनिमित्त इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (आरसीबी) संघाचा नवीन लोगो सर्वांसमोर आणला आहे. 'नवीन दशक, नवीन आरसीबी आणि नवीन लोगो', असे आरसीबीने आपल्या नवीन लोगोच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. 'दोन पायांवर उभा असलेला सिंह राजघराण्याकडे परतला आहे. मला विश्वास आहे की स्पर्धेत आमच्या नवीन ओळखीसाठी ते खूप महत्वाचे होते', असे आरसीबीचे अध्यक्ष संजीव चुरीवाला यांनी म्हटले.
हेही वाचा - 'बंद दाराच्या आड गोष्टी घडत होत्या', निवृत्त फिलँडरचा गंभीर आरोप!
आयपीएलच्या तेराव्या हंगामाला २९ मार्चपासून सुरुवात होणार आहे. आरसीबीने आपल्या ट्विटर अकाऊंटसह इन्स्टाग्राम आणि फेसबुक पेजवरील प्रोफाईल फोटो हटवला होता. तसेच ट्विटर अकाऊंटचे नाव 'रॉयल चॅलेंजर्स' असे केले होते.
-
Embodying the bold pride and the challenger spirit, we have unleashed the rampant lion returning him to the Royal lineage.
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) February 14, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
New Decade, New RCB, and this is our new logo #PlayBold #NewDecadeNewRCB pic.twitter.com/bdf1kvXYUl
">Embodying the bold pride and the challenger spirit, we have unleashed the rampant lion returning him to the Royal lineage.
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) February 14, 2020
New Decade, New RCB, and this is our new logo #PlayBold #NewDecadeNewRCB pic.twitter.com/bdf1kvXYUlEmbodying the bold pride and the challenger spirit, we have unleashed the rampant lion returning him to the Royal lineage.
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) February 14, 2020
New Decade, New RCB, and this is our new logo #PlayBold #NewDecadeNewRCB pic.twitter.com/bdf1kvXYUl
विराट कोहली, एबी डिव्हिलीयर्स, ख्रिस गेल, डेल स्टेन यांच्यासारख्या दिग्गजांचा समावेश असलेल्या आरसीबीला आयपीएलचे एकही विजेतेपद पटकावता आलेले नाही. यामुळे नावात बदल करून मैदानात उतरण्याचा विचार आरसीबी व्यवस्थापन करत आहे.
आरसीबी संघाचा कर्णधार विराट कोहलीने या संदर्भात ट्विट केले होते. त्यात त्याने, आरसीबीच्या सोशल मीडियावर बदल झाले आणि त्याची पुसटशी कल्पना कर्णधाराला नाही. काही मदत लागल्यास नक्की कळवा, असे म्हटले होते.
आरसीबीचा संघ -
विराट कोहली (कर्णधार), एबी डिव्हिलीयर्स, देवदत्त पड्डिकल, पार्थिव पटेल, अॅरोन फिंच, जोशुआ फिलिप, शहबाज अहमद, गुरुकीरत सिंह मान, पवन देशपांडे, मोइन अली, शिवम दुबे, ख्रिस मॉरिस, इसुरु उडाना, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, पवन नेगी, उमेश यादव, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज, केन रिचर्ड्सन आणि डेल स्टेन.