वेलिंग्टन - न्यूझीलंड संघाचा अनुभवी फलंदाज रॉस टेलर बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातून क्रिकेटच्या मैदानावर वापसी करणार आहे. न्यूझीलंडसाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या टेलरच्या वापसीविषयी, न्यूझीलंड बोर्डाने माहिती दिली. टेलरने फिटनेस टेस्ट पास केली असून तो तब्बल १ वर्षानंतर एकदिवसीय सामना खेळणार आहे.
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने ट्विट करत टेलरविषयी माहिती दिली आहे. टेलरने फिटनेस चाचणी पास केली आहे. तो वेलिंग्टन येथे बांगलादेशविरुध्द होणाऱ्या सामन्यात, अंतिम संघात असेल.
न्यूझीलंडने बांगलादेशविरुद्ध पार पडलेले दोन्ही सामने जिंकून मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे. आता उभय संघात तिसरा आणि अखेरचा सामना उद्या (ता.२६) होणार आहे.
बांगलादेशविरुद्धच्या अखेरचा सामना देखील विश्वकरंडकाच्या दृष्टीने महत्वाचा असल्याचे टेलरने सांगितले.
दरम्यान, दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडची आघाडी फळी कोसळली. तेव्हा कर्णधार टॉम लॅथमने डाव सावरला. त्याने शतकी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.
हेही वाचा - चेन्नई संघासाठी आनंदाची बातमी, 'हा' शिलेदार पुनरागमनासाठी सज्ज
हेही वाचा - IND vs ENG: इंग्लंडच्या अडचणीत वाढ, मॉर्गन दुखापतीमुळे उर्वरित मालिकेतून बाहेर