मेलबर्न - भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा ऑस्ट्रेलियामध्ये १४ दिवसांचा क्वारंटाइन कालवधी संपल्यानंतर भारतीय संघासोबत जोडला गेला आहे. त्याने संघातील खेळाडूंसोबत सरावाला देखील सुरूवात केली आहे. बीसीसीआयने रोहित शर्मा सराव करतानाचे फोटो शेअर केले आहेत.
बीसीसीआयने शेअर केलेल्या फोटोमध्ये रोहित शर्मा कॅच पकडण्याचा सराव करताना पाहायला मिळत आहे. इंजिन नुकतेच सुरू झाले आहे, ही तर फक्त एक झलक असून पाहू पुढे काय होतं, असे कॅप्शन बीसीसीआयने त्या फोटोंना दिले आहे. दरम्यान, रोहितला आयपीएलदरम्यान दुखापत झाली होती. यातून सावरल्यानंतर तो ऑस्ट्रेलियात दाखल झाला.
-
The engine is just getting started and here is a quick glimpse of what lies ahead. #TeamIndia #AUSvIND pic.twitter.com/3UdwpQO7KY
— BCCI (@BCCI) December 31, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">The engine is just getting started and here is a quick glimpse of what lies ahead. #TeamIndia #AUSvIND pic.twitter.com/3UdwpQO7KY
— BCCI (@BCCI) December 31, 2020The engine is just getting started and here is a quick glimpse of what lies ahead. #TeamIndia #AUSvIND pic.twitter.com/3UdwpQO7KY
— BCCI (@BCCI) December 31, 2020
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांची कसोटी मालिका १-१ अशा बरोबरीत आहे. उभय संघातील तिसरा सामना ७ जानेवारीपासून सिडनीच्या मैदानावर खेळला जाणार आहे. यासाठी भारतीय संघ जोरदार तयारी करत आहे.
दरम्यान, भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवल्यानंतर रोहित शर्माने इन्स्टागामच्या माध्यमातून आपण संघात दाखल होण्यासाठी सज्ज झालो असल्याचे म्हटले होते. आता जवळपास रोहित सिडनी कसोटीत खेळणार हे स्पष्ट झाले आहे. असे असले तरी, रोहितला कोणत्या खेळाडूच्या जागेवर संधी मिळणार हे पाहावे लागेल.
मयांक अगरवाल याला पहिल्या दोन कसोटी सामन्यात आपली छाप सोडता आली नाही. त्यामुळे मयांकच्या जागेवर रोहितला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रोहित शुबमन गिलसोबत सलामीला येऊ शकतो.
हेही वाचा - ICC Test Ranking : केन विल्यमसन जगातील 'नंबर वन' फलंदाज, स्मिथ-विराटला टाकलं मागे
हेही वाचा - Ind vs Aus : टीम इंडियाला जबर धक्का, उमेश यादवची उर्वरित कसोटी मालिकेतून माघार