मुंबई - सद्या क्रिकेटविश्वात विराट कोहलीनंतर दबदबा आहे तो रोहित शर्माचा. रोहित भारतीय संघाचा महत्वाचा खेळाडू आहे. त्याने अनेक सामन्यात भारतीय संघाला एकहाती विजय मिळवून दिला आहे. पण, रोहितला पदार्पणाच्या वेळी जेव्हा पाहिलो, तेव्हा मला पाकिस्तानचा भरभक्कम खेळाडू इंझमाम उल हकची आठवण आल्याचं 'सिक्सर किंग' युवराजने सांगितले.
युवराज म्हणाला, 'जेव्हा मी रोहित शर्माला पहिल्यांदा पाहिलो तेव्हा मला इंझमामची आठवण आली. रोहित इंझमान सारखे फटके मारत होता. महत्वाचे म्हणजे, त्यांची बॅटिंग स्टाईल इंझीसारखीच होती. प्रत्येक फटका मारण्यासाठी त्यांच्याकडे भरपूर वेळ असायचा.'
रोहितने २००७ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. रोहित-युवराज मधल्या फळीत फलंदाजीसाठी उतरत असे.
युवराजने ४० कसोटी, ३०४ एकदिवसीय आणि ५८ टी-२० सामन्यात भारताचे नेतृत्व केलं आहे. पण युवराजला निरोपाचा सामना खेळता आला नाही. संघात संधी मिळत नसल्याचे पाहून युवीने १० जून २०१९ ला निवृत्तीची घोषणा केली.
रोहित शर्मा आणि युवराज चांगले मित्र, असून रोहितने युवराजला क्रिकेटमधून सन्मानजनक निरोप मिळायला हवा. तो त्यांचा हक्क आहे, असे मत व्यक्त केले होते.
हेही वाचा - IPL आयोजनावर रैना म्हणाला.. सद्या लोकांचा जीव महत्वाचा, नंतर काय ते बघू
हेही वाचा - 'टीम इंडिया, चला जगाला आपली ताकद दाखवू'