मुंबई - भारतीय संघाचा डावखुरा फलंदाज शिखर धवनने रोहित शर्मा हा त्याचा बेस्ट फलंदाजी पार्टनर असल्याचे सांगितले. शिखरने इरफान पठाणशी व्हिडिओ लाईव्ह चॅट करताना अनेक खुलासे केले. यात त्याने धोनीच्या नावाला बेस्ट कर्णधार म्हणून पसंती दिली.
शिखर धवनने सांगितले की, 'आजघडीपर्यंत मी जास्तीचे सामने दोन कर्णधारांच्या नेतृत्वात भारतीय संघात खेळलो आहे. यात मला धोनी बेस्ट कर्णधार वाटला. तर फलंदाजी पार्टनर म्हणून रोहित शर्मासोबत मला फलंदाजी करण्यास आवडते.'
रोहितने मागील वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत पाच शतकं झळकावली होती. रोहितच्या या कामगिरीचे कौतूक शिखरने केलं. याशिवाय त्याने बेस्ट फलंदाज म्हणून विराट कोहलीचेही नाव घेतले.
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीचा सामना करणे अवघड असल्याचेही धवनने सांगितले. धवन आणि रोहित एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाची सलामीवीराची भूमिका पार पाडतात.
कोरोनामुळे सद्या जगभरातील जवळपास सर्व स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अशा काळात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) क्रिकेट पुन्हा सुरु करण्याच्या उद्देशानं प्रयत्न सुरू केले आहेत. बीसीसीआय सेफ झोनमधील खेळाडूंसाठी 'आयसोलेशन कॅम्प'चे आयोजन करण्याचा विचार करत आहे. या कॅम्पचे आयोजन बंगळुरूमध्ये करण्यात येणार असल्याचे वृत्त एका इंग्रजी माध्यमाने दिलं आहे.
हेही वाचा - इंग्लंडचे क्रिकेटपटू प्रशिक्षणाला करणार सुरूवात
हेही वाचा - ऑस्ट्रेलियाच्या कंपनीने सचिनची मागितली माफी